नाशिक

पुढील दहा दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढणार

उत्तर भारतातून येणार्‍या थंड वार्‍यांचा महाराष्ट्रावर प्रभाव

सिन्नर : प्रतिनिधी
राज्यात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा थंडीच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन थंडीचा प्रभाव वाढू शकतो. विशेषतः विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर अधिक जाणवण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रावर जमिनीपासून सुमारे तीन किलोमीटर उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वार्‍यांची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील हवेचा दाब 1014 हेक्टोपास्कलपर्यंत टिकून आहे. वाढलेल्या हवेच्या घनतेमुळे पहाटेच्या वेळी राज्याच्या भूभागावर थंडीचे संक्रमण होत आहे. त्यातच उत्तर भारतातील हवेचा दाब 1016 हेक्टोपास्कलपर्यंत वाढल्याने तेथील बर्फाळ थंडी ईशान्येकडून वाहणार्‍या थंड व कोरड्या वार्‍यांद्वारे महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. अकवान चक्रीवादळाने दिशा बदलल्यानेही महाराष्ट्रातील थंडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडीचा प्रभाव चांगलाच जाणवू शकतो.
दरम्यान, वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याने दव पडण्याचे प्रमाण मर्यादित राहण्याची शक्यता आहे. रब्बी पिकांच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर ठरू शकते. येत्या पंधरा दिवसांत अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता नसून, महाराष्ट्रातही पावसाचे संकेत नाहीत.

The intensity of the cold will increase across the state over the next ten days.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कांद्याचा का होतो नेहमीच वांधा?

- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…

5 minutes ago

ये तो होना ही था!

- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…

9 minutes ago

1972 ते 2026 : दुष्काळ बदलला, पण प्रश्न तेच

- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…

17 minutes ago

मदतीची शिक्षा!

- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्‍या अनेक घटना सातत्याने…

23 minutes ago

गुरू नानक : समता, सेवा आणि मानवतेचा प्रकाश

नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…

30 minutes ago

धर्मनिरपेक्ष भगवी वाट

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…

33 minutes ago