नाशिक

चॅट जीपीटीवर रेट्रो ट्रेंड!

सोशल मीडियावर झळकले 80 च्या दशकातील फोटो

नाशिक : प्रतिनिधी
एआयने आताच्या पिढीला थेट 80 च्या दशकात नेऊन ठेवले आहे. सध्या चॅट जीपीटीवर 80 च्या दशकातील लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऐंशीच्या दशकातील लूक रिक्रएट करण्याचा मोह सर्वांनाच झाला आहे.
ऐंशीच्या दशकातला लूक ट्राय केला नाही तर समाज मला स्वीकारणार नाही का? किंवा नव्या ट्रेंडचे फोेटो सोशल मीडियावर टाकणे शास्त्र असते ते… असे गमतीशीर मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चॅट जीपीटी किंवा इतर एआय प्लॅटफॉॅर्मवर सध्या 80 च्या दशकातील फोटोंचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकर्‍यांनी 80 च्या दशकातील वेशभूषा, केशभूषा कशी होती, आसपासचा परिसर कसा होता, हे यानिमित्ताने व्हायरल केले जात आहे. त्याद्वारे आठवणींना उजाळा मिळाल्याचे नेटकरी म्हणत आहेत.
सोशल मीडिया, एआयचा जमाना असल्याने क्षणार्धात काही घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात. लाइक्स मिळतात. कमेंट पास केल्या जातात. सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसह इतर सोशल मीडियावर 80 च्या दशकातील एआयच्या सहाय्याने तयार केलेले फोेटो अपलोड केले जात आहेत. असा एआयआधारित फोेटो आपलाही असावा असा मोह नेते, अभिनेते यांच्यासह आबालबृद्धांना झाला आहे. 80 च्या दशकात ज्यांचा जन्म किंवा तरुणपण होते, ते कसे दिसत होते किंवा त्यावेळी कोणती फॅशन होती, हे रिक्रिएट करताना आठवणींत हरवून गेल्याचे दिसले.
ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, गोविंदा, विनोद खन्ना, ऋषी कपूर, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, रेखा, मीनाक्षी शेषाद्री, पद्मिनी कोल्हापुरे, जयाप्रदा आदींचे लूक त्यावेळी मोठ्या प्रमाणात
चर्चेचा विषय ठरले होते.
त्यामुळे असा लूक करून काही काळ भूतकाळात रमण्याचा आनंद नेटकरी घेत आहेत. चॅट जीपीटीवर घीबलीचा लूक मार्च 2025 ट्रेंडिंगला होता. आपले फोेटो घीबली स्टाइलने (कार्टूनसारखे) रिक्रएट करण्यात आले होते. त्यामुळे एआय आहे तर सबकुछ मुमकिन है। असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

असा तयार करा फोटो
चॅट जीपीटी अ‍ॅप उघडा
+ फोटो जोडण्याचा पर्याय निवडा
तुमचा फोटो अपलोड करा
चांगला आणि स्पष्ट फोटो निवडा – चेहरा नीट दिसणारा फोटो असावा.
इमेज टूलमध्ये फोटो अपलोड करा.
80 च्या दशकाचा लूक देण्याची सूचना करा.
त्या काळातील हेअरस्टाइल आणि कपडे एआयकडून तयार करून घ्या.
रेट्रो अ‍ॅक्सेसरीज- गॉगल, घड्याळ, दागिने आदींचा वापर करता येतो.
80 च्या दशकातील पाश्वर्र्भूमी- स्टुडिओ, घर, रस्ते किंवा त्या काळातील वातावरण निवडा.
जुन्या फिल्म कॅमेर्‍याचा इफेक्ट- फिल्म ग्रेन, फेडेड कलर्स आणि डायरेक्ट फ्लॅश दिला जातो.
चेहरा आणि ओळख कायम ठेवण्याची सूचना देणे महत्त्वाचे आहे.
एआयने तयार केलेल्या फोटोमध्ये आवश्यक बदल करून पुन्हा जनरेट करता येतो.

 

Retro trend on ChatGPT!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिक फिल्मसिटीच्या स्वप्नाला सरकारचे ढोपराने गूळ लावणे सुरूच

मंत्री शेलारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या नाशिक : प्रतिनिधी केवळ भारताच्याच नव्हे, संपूर्ण आशियाच्या सिनेसृष्टीचा उगम…

11 minutes ago

ड्रेनेज, मोकाट कुत्र्यांवरून प्रशासन लक्ष्य

स्थायी सदस्यांचा आरोप, पाणीपट्टी वाटपात घोळ नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेने पाणीपट्टी वितरणासाठी नेमलेल्या खासगी…

23 minutes ago

मुसळगावात 220 केव्हीचे वीज उपकेंद्र

सिन्नरच्या पारेषण व्यवस्थेला बळ 300 एमव्हीए क्षमतेची भर पडणार; 121 किमी पारेषण वाहिन्या उभारणार, वर्षभरात…

29 minutes ago

विद्यमान नगरसेविकेच्या घराबाहेरून क्रेटा चोरी

बनावट नंबरप्लेट लावून टोलनाका पार, फास्टॅग संदेशामुळे चोरीचा माग लागला सिडको : प्रतिनिधी अंबड पोलिस…

36 minutes ago

पोषणाला दर्जाची जोड हवी

शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाचा आहे, असे आपण अभिमानाने सांगतो, पण शिक्षणासाठी आवश्यक असलेले आरोग्य आणि…

53 minutes ago

युद्धात अडकलेली अमेरिका

इराणचे नेतृत्व संपुष्टात आणले आहे, इराणची क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत, त्यांच्याकडे युद्ध करण्याची क्षमता नाही,…

56 minutes ago