आस्वाद

सपना कटाळे यांची संघर्षगाथा

पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर येणे ही कोणत्याही महिलेसाठी कठीण वेळ असते. मात्र, नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण येथील सपना आत्माराम कटाळे यांनी या संकटाला हार न मानता धैर्याने सामोरे जात स्वतःचा उदरनिर्वाह उभा केला. शिवणकाम, मास्कनिर्मिती, कटलरी व्यवसाय अशा विविध कामांतून त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाला आधार दिला नाही, तर इतर महिलांनाही स्वावलंबनाचा मार्ग दाखवला.
सपना कटाळे यांचे आयुष्य 13 मे 2020 रोजी अचानक बदलले. कामावर जात असताना रेल्वे अपघातात पती आत्माराम एकनाथ कटाळे यांचे निधन झाले. त्यावेळी मुलगी अंशिता आणि मुलगा विराज लहान होते. कुटुंबाचा आधारच हरपल्याने संपूर्ण जबाबदारी सपना यांच्या खांद्यावर आली. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी खचून न जाता संघर्षाचा मार्ग स्वीकारला. कोरोनाच्या काळात उदरनिर्वाहासाठी त्यांनी मास्क तयार करून विक्री सुरू केली. त्याचबरोबर शिवणकाम आणि कटलरी व्यवसाय करून त्यांनी कुटुंबाचा खर्च सांभाळला. कुटुंब आणि व्यवसाय यात समतोल राखणे, हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते, पण त्यांनी चिकाटीने दोन्ही जबाबदार्‍या सांभाळल्या.
एकल महिला म्हणून समाजात उभे राहणे सोपे नव्हते. सुरुवातीला सुरक्षिततेची चिंता, सामाजिक दबाव आणि आत्मविश्वासाचा अभाव, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना प्रशिक्षण देत त्यांना लहानमोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावातील अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. त्या क्षणी सपना कटाळे यांना वाटले की, समाजात बदलाची सुरुवात झाली आहे.
व्यवसाय करत असतानाच त्या उमेद अभियानांंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत झाल्या. आज सपना कटाळे स्वतःला केवळ एक उद्योजिका म्हणून नव्हे, तर समाजासाठी काम करणारी प्रेरणादायी महिला म्हणून उभी करत आहेत. आज जर त्यांना त्यांच्या भूतकाळातील स्वतःशी बोलण्याची संधी मिळाली, तर त्या म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव. तू मजबूत आहेस आणि तुझी स्वप्ने नक्की उंच भरारी घेतील.

Sapna Katale’s struggle story

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago