लाईफस्टाइल

सेक्सटॉर्शन : ऑनलाइन फसवणुकीचा नवा मार्ग

सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट आज जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेट चे स्वरूप जसे विस्तारित गेले तसे ऑनलाइन गुन्हेगारीही विस्तारित गेली. ऑनलाइन गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची सायबर शाखा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे असे असतानाही ऑनलाइन गुन्हे करणारे नवनवीन मार्ग शोधून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करत असतात. या फसवणुकीला केवळ सर्वसामान्य नागरिकच नाही तर नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर या सारखे प्रतिष्ठित नागरिक ही बळी पडतात. या सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीचा मार्ग शोधून काढला आहे. तो आहे सेक्सटॉर्शन. अलीकडच्या काळात ऑनलाइन लैंगिक छळाचे प्रमाण वाढले आहे त्यातूनच हा शब्द निर्माण झाला आहे. सेक्सटॉर्शन म्हणजे खंडणी तसाच लैंगिक खंडणी म्हणजे सेक्सटॉर्शन. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटचा यासाठी वापर केला जातो. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवरुन तुम्हाला एका अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती फ्रेंड रिक्वेस्ट माहिती न घेता स्वीकारली जाते. नंतर मेसेंजरच्या माध्यमतातून चॅटिंग केली जाते. त्यानंतर एकमेकांचे व्हाट्सएप नंबर घेऊन व्हाट्सएपवर चॅटिंग होते. चॅटिंग बरोबरच व्हिडीओ कॉल, व्हाट्सएप कॉल करण्यास सुरुवात होते. समोरची व्यक्ती अंगप्रदर्शन करून अश्लील हावभाव करते. समोरच्या व्यक्तीला मोहात अडकवले जाते. त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून विवस्त्र अश्लील बाबी करून घेतल्या जातात. विशेष म्हणजे या सर्वांचे व्हिडीओ ऑन स्क्रीन रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर काही दिवसांच्या फरकाने तुम्हाला मेसेज, फोन कॉल करून पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास तुमचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारे लैंगिक खंडणी सेक्सटॉर्शनची मागणी केली जाते. यात प्रामुख्याने कॉलेजमधील विद्यार्थी व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना टार्गेट केले जाते. यात फसणारे बदनामीला घाबरून या सायबर गुन्हेगारांना हवी ती रक्कम देतात. बऱ्याचदा रक्कम देऊनही पुन्हा मागणी केली जाते. त्यामुळे फसवले गेलेले मानसिक तणावात येतात त्यातून ते आत्महत्येचा मार्गही स्वीकारतात. या प्रकाराला बळी पडून काही जणांनी आत्महत्या केल्याच्या  घटनाही घडल्या आहेत.  सेक्सटॉर्शन हा पैसे कमावण्याचा नवा मार्ग सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. या सायबर गुन्हेगारांना पकडणे सायबर पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे कारण हे गुन्हेगार राज्याबाहेर किंवा देशाबाहेरचेही असू शकतात. या  सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी.  कोणाचीही अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. आपली फ्रेंड लिस्ट आणि फॉलोअर्स वाढवण्याचा अट्टाहास आपले आर्थिक व मानसिक नुकसान करू शकतो. आजची तरुणाई सोशल मीडियाची मोठी फॅन बनली आहे. इंटरनेट, मोबाईल ही तरुणांची जीवनावश्यक गरज बनली आहे. मात्र याचा वापर समाजहिताच्या गोष्टी जोपासण्यासाठी झाला तरच उत्तम नाहीतर तुमची एक चूक तुमच्या जिवावरही बेतू शकते. म्हणूनच प्रत्येकाने सावधगिरी बाळगून सोशल मीडियाचा वापर करावा.
श्याम ठाणेदार
Team Gavkari

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

7 hours ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

7 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

8 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

8 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

8 hours ago