सभापती,उपसभापती निवडीनंतर नाराजी उफाळल्याची चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समितीची ओळख आहे.शिवाय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या लासलगाव-येवला विधानसभा मतदार संघात असल्यामुळे या बाजार समितीवर कोणत्या गटाचे व कोणत्या पक्षाचे वर्चस्व आहे याबाबत मोठी चर्चा असते.निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात या बाजार समितीचे संचालक आपआपले वर्चस्व सिध्द करत असतात अशा या राजकारणात उलथा पालथ करणार्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाचे अनेक पैलू आहेत. सध्या बाजार समितीच्या संचालकांमध्ये एकमत नसल्याने विकासकामाना मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सभापती ज्ञानेश्वर जगताप व उपसभापती दरेकर यांच्या निवडीवरुन संचालकामध्ये आपापसात मतभेद झाल्याचे बोलले जात आहे.
लासलगाव बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची दोन आठवड्यांपूर्वी निवड झाली. यामध्ये पंढरीनाथ थोरे यांच्या गटाचे व भाजपचे ज्ञानेश्वर जगताप सभापती झाले.तर जयदत्त होळकर गटाचे दरेकर उपसभापती झाले. छगन भुजबळ यांनी सभापती पदासाठी जगताप यांचे नाव सुचविले होते. मात्र या निवडणुकीत सर्व संचालक मनापासून एकत्र आले होते का? हा संशोधनाचा विषय आहे.सभापती व उपसभापती निवडीप्रसंगी भुजबळाचे विश्वासू दिलीप खैरे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित असल्याने सर्व संचालकांवर एक प्रकारे दबाव असल्याचे चित्र होते. तसे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते दिसूनही आले. त्यामुळे आता.. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मतभेदाचे नवे राजकीय वारे वाहू लागले आहेत. लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत सभापती ज्ञानेश्वर जगताप आणि उपसभापती दरेकर यांसह त्यांचे पाच समर्थक असे सातच संचालक एका बाजूने तर 18 पैकी 11 संचालकांनी विषय पत्रिकेवरील विषया संदर्भात आपली भूमिका लेखी स्वरुपात सचिव यांच्याकडे सादर केली असल्याने आगामी काळात कारभार चालणार कसा? याची झलकच पहावयास मिळाली.
लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळातील हा वाद आता परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे पडद्यामागून विविध राजकीय डावपेच आखले जात आहेत भुजबळांच्या संमतीने व होळकर यांनी सुचविलेले सभापती ज्ञानेश्वर जगताप व उपसभापती दरेकर यांच्या विषयी नाराजी म्हणून हे 11 संचालक अलिप्त असल्याची चर्चा आहे.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभापती, उपसभापती निवडणुकीत थेट हस्तक्षेप केला गेला भुजबळ यांच्या व्यतिरिक्त असलेला पंढरीनाथ थोरे आणि ज्ञानेश्वर जगताप यांच्या गटात फूट पडली आहे सध्या ज्ञानेश्वर जगताप हे होळकर यांच्या समवेत आहेत.सभापती आणि उपसभापती यांची नावे निश्चित करताना पडद्यामागून मोठे राजकारण घडले. त्यामुळे भुजबळ यांनी सभापती म्हणून जगताप यांचे नाव सुचविले. उपसभापती कोण? हे मात्र भुजबळ यांनी होळकर यांच्यावर सोपविले होते. होळकर यांनी राजकीय सोय म्हणून होळकर समर्थक दरेकर यांना उपसभापती केले. सभापती व उपसभापती निवड ही बहुतांशी संचालकांना मान्य नव्हती असा अर्थ राजकीय खेळीवरुन निघतो आता सभापती आणि उपसभापती दोघांनाही यापुढे बाजार समितीचा कारभार कसा करावा ही मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रोजच संचालकांमध्ये राजकीय डावपेच आखले जात आहेत. 11 संचालक विरोधात गेल्याने अविश्वास प्रस्तावाचा खेळ होतो की काय.? याचीही भीती सभापतींना आणि उपसभापतींना आहे.
दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा बिबट्याने केलेल्या…
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी महाराष्ट्रातील नामवंत कवी संदीप जगताप व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या…
जिल्ह्यात पीककर्ज वसुलीत तालुका अव्वल असतानाही दुजाभाव चांदवड ः वार्ताहर जिल्ह्यात पीककर्ज वसुलीत अव्वल असूनही…
लासलगाव येथे बारदान गोदामला आग लासलगाव:-समीर पठाण लासलगाव बाजार समितीत शेतकरी निवास येथील बारदान गोदामास…
बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट मनमाडचा शीख मळा बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण...! मनमाड. प्रतिनिधी: चार दिवसांपूर्वीच एक…
इंदिरानगरमध्ये ठिय्या, पोलीस निरीक्षकावर मारहाणीचा आरोप सिडको विशेष प्रतिनिधी :-इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर वादग्रस्त…