नाशिक

नायगाव उपबाजारात कांदा लिलाव वेळेत सुरू करा; अन्यथा आंदोलन

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची बाजार समिती कामकाज सुधारणा मोहीम

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव येथील उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव वेळेत सुरू करावे, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी आवाज उठवला आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने बाजार समिती कामकाज सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सिन्नर येथील नायगाव उपबाजार कांदा मार्केटला भेट देत प्रशासनाला इशारा दिला.
नायगाव उपबाजारात कांदा लिलाव सकाळी 10 वाजता सुरू होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत लिलाव सुरू केला जात असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.
दूरवरून ट्रॅक्टर व पिकअपमधून कांदा घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांना तासन्तास उन्हात व धुळीत थांबावे लागत आहे. त्यामुळे लिलाव दररोज सकाळी बरोबर 10 वाजता सुरू करावेत, कांदा विक्रीनंतर शेतकर्‍यांना रक्कम तात्काळ अदा करण्याची यंत्रणा लागू करावी, बाजार आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये व उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Start onion auction on time in Naigaon sub-market; otherwise protest

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

5 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

5 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

5 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

5 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

5 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

5 hours ago