नववर्षात वाहतुकीसाठी खुला होणार
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अंत्यत वर्दळ असलेल्या द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तब्बल 213 कोटी रुपये खर्चून द्वारका अंडरपास (भुयारी मार्ग) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान या प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले असून जानेवारी त नववर्षात हा अंडरपास वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
हा मार्ग खुला होणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका परिसरातील रस्त्याची खडखड थांबणार आहे. या प्रकल्पाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. काठेगल्ली ते द्वारका हा कच्चा रस्ता पुढील 15 दिवसांत पक्का होणार असल्याने, या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनधारकांची धुळीपासून आणि खड्ड्यांपासून सुटका होईल. जानेवारी महिन्यात मुख्य अंडरपास वाहतुकीसाठी खुला होताच, द्वारका चौकातील वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी फुटून नाशिककरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.
नाशिकरोड कडे जाणारा सर्व्हिसरोड एक महिन्यापुर्वी सुरु करण्यात आला होता. मात्र काठेगल्ली ते व्दारकापर्यंतचा रस्ता अद्याप कच्चा असून येत्या 15 दिवसात त्याचे काम पुर्ण केले जाणार आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून या कामास सुरुवात झाली होती. हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाची मुदत निश्चित करण्यात आली होती. प्रशासनाने कामाचा वेग कायम ठेवल्याने निर्धारित मुदतीतच प्रकल्प पूर्ण होत असल्याचे चित्र आहे. या प्रकल्पांतर्गत द्वारका ते नाशिकरोड या बाजूच्या रस्त्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून, तो रस्ता गेल्या एक महिन्यापासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
प्रवाशांना दिलासा
अंडरपासच्या कामासाठी मुख्य रस्ता बंद केल्याने नाशिकरोडकडे जाणार्या आणि तिकडून शहरात येणार्या वाहनधारकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. याची प्रशासनाने दखल घेत नुकताच बंद केलेला मार्ग दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवरून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांची होत असलेली कोंडी टळली असून, नाशिकरोडकडे जाणारी व येणारी वाहतूक आता अत्यंत सुरळीत झाली आहे.
Work on the Dwarka underpass project is in its final stages.
जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्यांच्या खात्यावर पाच हजार नाशिक : प्रतिनिधी अनियमित पावसामुळे खरीप…
हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया नाशिकरोड : विशेष…
दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी…
आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…
ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी नाशिक : प्रतिनिधी दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि…