जानोरी : प्रतिनिधी
येथील माहेर असलेल्या 23 वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणार्या छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याने नाशिक रोड येथील सासरच्या सहा जणांविरुद्ध दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानोरी येथील भाऊसाहेब पंढरीनाथ घुमरे यांची कन्या दिव्या हिचा विवाह 1 वर्षापूर्वी नाशिकरोड येथील विजय संजय खोले रा.खोले मळा, नाशिक रोड यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच खोले कुटुंबीयांकडून मयत दिव्या हिस घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरू झाला. तसेच तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती दिव्याला मिळाल्याने खोले कुटुंबीयांकडून दिव्याचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. याबाबत दिव्याने माहेरच्या मंडळींना वेळोवेळी माहिती दिली. परंतु हा छळ असह्य झाल्याने पाच दिवसापूर्वी वडिलांच्या घरी विषारी औषध सेवन केले. तिला घरच्यांनी उपचारासाठी नाशिक येथे दाखल केले होते. परंतु काल सकाळी उपचार घेत असताना मयत झाल्याने दिव्याचे वडील भाऊसाहेब पंढरीनाथ घुमरे यांनी दिंडोरी पोलिसात तक्रार दाखल केली.
धक्कादायक : तरुणाला हात पाय बांधून धरणात फेकले
पोलिसांनी मयत दिव्याचा पती विजय खोले,सासू रोहिणी, नणंद वैशाली संजय खोले,गौरी संजय खोले सर्व राहणार खोले मळा, नाशिकरोड तसेच नणंद दिपाली विकास बोस व नंदोई विकास शिवाजी बोस रा. जानोरी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडुरंग कावळे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड,पो.ना.सुदाम धुमाळ आदी करीत आहेत.
हे ही वाचा