उद्धव ठाकरे : दादरला रामरक्षा, हनुमान चालीसा पठण राज्य आंदोलनाची सुरुवात
मुंबई :
अयोध्येथील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ’रामरक्षा आंदोलन’ करण्यात आले. दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती तसेच रामरक्षा आणि हनुमान चालीसा, मारुती स्त्रोत पठणाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, अयोध्येची झांकी असेल तर काशी-मथुरा किती लुटतील, असा प्रश्न उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय अब हिंदू माफ नहीं करेगा। या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, मंदिर वही बनायेंगे, पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं मला नाही वाटत तेवढं दुसर्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले असेल.
शीलापूजन, रथयात्रा, अयोध्येत जाऊन कारसेवा केली होती, असे उद्धव ठाकरे यांनी
सांगितले.
मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, तेव्हा देशातील एकच मर्द शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदूंच्या पाठीशी उभे राहिले होते. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, तेव्हा आधार शोधत होता. त्यावेळेला शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला, नको ती लोकं सत्ता भोगत आहेत, हिंदू आजही भरडला जातोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बारा वर्षे झालीत, आज आपण ज्यासाठी मेहनत केली होती.ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलाखानी विडा उचलला. कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना शिवसैनिक, एकच शिवसेना देशात अशी आहे, समोर उभी राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारु शकेल. काय वातावरण होते. बारा वर्षात आपल्या भगव्याचं सरकार तिकडं आलं असताना आपल्याला वाटत होतं, अब हिंदू मार नही खायेगा, मात्र हिंदूंना लुटणारं सरकार तिथं बसलंय हे आपलं दुर्भाग्य आहे. केदारनाथातील सोनं लुटले गेले. मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांवर उज्जैनमधील जमीन लुटली गेल्याचे आरोप
झाले.
बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येत एक आयएएस ऑफिसर बोलतात, आईचे सोन्याचे दागिने वितळवले आणि एक किलोचा सोन्याचं मुलामा असलले रामचरितमानस गायब झाले, नऊ नऊ तास बसवलं जातं पण उत्तर दिलं जात नाही. शिवसेनेने फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे दिलेले, चांदीच्या विटा दिलेल्या, कुठे गेले सगळं, असा सवाल उद्ध ठाकरेंनी केला. बारा वर्षांपूर्वी आपण त्यांना सत्तेत आणलं. मात्र, अयोध्येला लुटणारे सरकार बसले आहे हे मोठं दुर्दैव आहे. ज्या प्रकारची लूट यांनी अयोध्येमध्ये केली त्याची मला शिसारी येते. शिसारी यासाठी येते कारण की, जे पैसे अयोध्येमध्ये दान केले गेले, ते पैसे या लोकांनी शौचालयामध्ये लपवले. हा हिंदुत्वाचा अपमान आहे. सर्वसामान्य गोरगरीब हिंदू अयोध्येत जातो. जितके पैसे असतील ते पैसे दान करतो आणि या पैशांची हे लोक चोरी करताय. यांना लाज वाटली पाहिजे, असा प्रहार यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.
’पुन्हा एकदा हिंदुत्व जागं करायचं’
उद्धव ठाकरे म्हणाले, की मला आता पुन्हा एकदा हिंदुत्व जागं करायचं आहे. रामाची रक्षा करायची आहे. आज इतका पाऊस असतानादेखील हिंदू एकत्र आलाय. आपण आज रामरक्षा म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. आज पावसामध्ये ठिणगी पेटली आहे. हे रामभक्त कसे आहेत, ते विसरले असतील. त्यांना सांगायचं की, श्रीराम यांच्याबरोबर वानरसेना होती. त्यांनी रावणाची लंका राख केली होती. तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण चोरलं असेल. मात्र, ज्या मशालीने लंका जाळली ती मशाल आमच्यासोबत आहे. अन्यायाची लंका आम्ही राख केल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर जर तुमच्या रक्तामध्ये खरं हिंदूंचं रक्त असेल तर रामरक्षा पठण करण्यासाठी आमच्याबरोबर या.
Theft of donations at the Shriram Temple; now they will loot Kashi and Mathura too.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik