बिबट्याच्या हल्ल्यात युवतीचा दुर्दैवी मृत्यू

दिंडोरी :  प्रतिनिधी

तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला . पायल राजेंद्र चव्हाण असे या युवतीचे नाव आहे.नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापणेसाठी गेली असता बिबट्याने हल्ला केला नातेवाईकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले मात्र बिबट्या च्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली तिला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वन विभागावर रोष व्यक्त केला. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरे यांचेवर हल्ले होत आहे. काही महिन्यापूर्वी गुराखी मुलाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ्यांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्या चा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती अभ्यासात हुशार असलेल्या पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन सिडको विशेष प्रतिनिधी नाशिकचा संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले…

6 hours ago

लासलगाव बाजार समिती संचालकांमध्ये फूट?

सभापती,उपसभापती निवडीनंतर नाराजी उफाळल्याची चर्चा नाशिक : प्रतिनिधी आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून…

20 hours ago

‘माती मागते पेनकिलर’ कवितासंग्रहाला पुरस्कार जाहीर

पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी महाराष्ट्रातील नामवंत कवी संदीप जगताप व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या…

21 hours ago

पीककर्ज वाटपात चांदवड तालुक्यावर अन्याय

जिल्ह्यात पीककर्ज वसुलीत तालुका अव्वल असतानाही दुजाभाव चांदवड ः वार्ताहर जिल्ह्यात पीककर्ज वसुलीत अव्वल असूनही…

21 hours ago

बारदान गोदामाला आग, आठ ते दहा लाखांचे नुकसान

लासलगाव येथे बारदान गोदामला आग लासलगाव:-समीर पठाण लासलगाव बाजार समितीत शेतकरी निवास येथील बारदान गोदामास…

1 day ago

बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट मनमाडचा शीख मळा

बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट मनमाडचा शीख मळा बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण...! मनमाड.  प्रतिनिधी: चार दिवसांपूर्वीच एक…

1 day ago