महाराष्ट्र

अनेमिया म्हणजे काय

– कारणे, लक्षणे व उपचार

डॉ.  निलेश वासेकर – 

रक्त विकार तज्ञ , 

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ,

नाशिक

‘अनेमिया’ त्याला मराठी मध्ये  “पंडुरोग” किंवा ‘रक्तक्षय’ देखील म्हणतात. रक्तात हिमोग्लोबिन किंवा तांबड्या पेशींचे प्रमाण कमी झाल्याकारणाने  पंडुरोग होतो.

अनेमिया म्हणजे काय ?

अनेमिया म्हणजे पंडुरोग किंवा रक्तक्षय ह्या नावानी ओळखला जातो. अनेमिया या विकारामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची संख्या कमी होणे म्हणजेच RBC ची संख्या कमी होणे हे दिसून येते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून अनेमियाचे निदान केले जाते.

हिमोग्लोबिन हे रक्तातील ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य करत असते. पण कोणत्याही कारणाने शरीरातील लाल रक्त पेशींची संख्या किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले कि शरीरातील विविध अवयवांच्या उतींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होऊ शकत नाही.

शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता झाल्याने मांसपेशी व टिशू याना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. त्यामुळे हृदय, मेंदू यांसारख्या महत्वाच्या अवयवांना रक्तातून ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे त्या अवयवांना त्यांचे काम नीट पार पडत येत नाही.

हिमोग्लोबिन तयार कसे  होते ?

हिमोग्लोबिन कसे तयार होते व त्याचा उपयोग मानवी शरीरात कसा होतो याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

तर, ‘लोह’ हे एक शरीरातील खनिज आहे. लोह हे खनिज हिमोग्लोबिनचे निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. हे खनिज शरीरातील RBC ला शरीराच्या सर्व भागात ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करतात. हिमोग्लोबिन हे लोह आणि प्रथिने यांपासून बनलेले असतात. (लोह + प्रथिने).

अनेमिया चे प्रकार

अनेमिया आजाराचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत:-

1 Iron Deficiency Anemia :- हा आजार रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया आजार आहे. जर रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाल्यास या प्रकारचा अनेमिया आजार होतो.

2. Pernicious Anemia :- हा आजार रक्तातील व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया आजार आहे. जर रक्तात व्हिटॅमिन B12 या घटकाची कमी झाल्यास हा आजार उदभवतो.

3. Megaloblastic Anemia :- हा आजार रक्तातील फॉलीक ऍसिड च्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया आजार आहे. जर रक्तात फॉलीक ऍसिडचे प्रमाण कमी झाल्यास हा आजार होतो.

4. Sickle Cell Diseases, Thalassemia :- हा आजार जेनेटिक कारणांमुळे म्हणजे आनुवंशिकतेमुळे होणारा अनेमिया आजार आहे.

अनेमिया या आजाराच्या प्रकारांबद्दल आपण जाणून घेतले आहेत, आत आपण या आजाराचे कारणे कोणती आहेत याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात.

अनेमिया आजाराची कारणे

शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी शरीराला पुरेशा रक्ताची गरज असते. त्याच रक्तातील रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. ह्याच हिमोग्लोबीनमुळे शरीराला ऑक्सिजन चा पुरवठा होतो किंवा हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजन शरीरातील इतर अवयवांपर्यंत वाहून न्यायचे काम करते. पण हेच ऑक्सिजनचे प्रमाण/पुरवठा कमी झाल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. आता हीच कारणे आपण जाणून घेऊया..

अंतर्गत रक्तस्त्राव :-  रक्तस्त्राव झाल्याने अनेमिया होऊ शकतो. प्रामुख्याने अपघात, शस्त्रक्रिया, मूळव्याध ह्या कारणांमुळे रक्तस्राव होतो त्यामुळे रुग्णाला अशक्तपणा येऊन अनेमिया होऊ शकतो.

लोहाची कमतरता :-  लोहाची कमतरता झाल्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया होतो. लोहाची गरज हि तुमच्या हाडांची पुरेशी वाढ करण्यासाठी व शारीरिक कार्य सुरळीत ठेवण्यासाठी असते. पण, जर आपल्या आहारातून लोह पुरेशा प्रमाणात शरीरात नाही गेले अनेमिया होऊ शकतो. कधी कधी औषधे, अन्नपदार्थ, कॅफेनयुक्त पदार्थ या कारणांमुळे अनेमिया होऊ शकतो.

रक्तक्षय :-  रक्तक्षय म्हणजे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे. जर शरीरातील रक्ताचेच प्रमाण कमी झाले तर, लोहाची देखील कमतरता होऊ शकते. आणि रक्तक्षय होण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

मासिक पाळीत अतिरक्तस्राव :– मासिक पाळीच्या समस्या प्रत्येक स्त्रीला जावे लागते.  पण कधी कधी काही शारीरिक बदलांमुळे किंवा काही हार्मोनल बदलांमुळे रक्तस्त्राव मासिक पाळीत अधिक होतो त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

बाळंतपण:- बाळंतपणात रक्तस्त्राव होतोच पण त्याचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ते धोक्याचे असते.  ह्या रक्तस्त्रावामुळे अशक्तपणा येण्याची किंवा अनेमिया होण्याची दाट शक्यता असते.

अनेमियाची लक्षणे

आपण अनेमिया चे कारणे कोणती याबद्दल जाणून घेतले आहे. जर अनेमिया झाला तर शरीर तुम्हाला काही लक्षणे दाखवायला सुरुवात करते:-

डोकेदुखी :- मेंदूलाच जर रक्ताचा पुरवठा कमी झाला तर सतत डोकेदुखीचा त्रास जाणवायला लागतो. सतत डोकेदुखी हे एक अनेमिया आजाराचे लक्षण आहे, त्यासाठी जर सतत डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्लड टेस्ट करून घ्यावी.

 

चक्कर येणे :– प्रथम शरीरात रक्त असणं महत्वाचे आहे त्यात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित असणं फार गरजेचे आहे. कारण जर शरीरात रक्त आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य प्रमाणात नसेल तर शरीराचे योग्य ते पोषण होत नाही.

त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर यायला सुरुवात होते. जर आपणास परत परत चक्कर येत असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्यावी.

छातीत दुखणे/हृदयाचे ठोके वाढणे/धाप लागणे :– जर शरीरातील रक्ताचा पुरवठा हा कमी व्हायला सुरुवात झाली तर हृदयालाही रक्तपुरवठा कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे शारीरिक क्रिया ह्या व्यवस्थित पार पडत नाही त्यामुळे त्यांचा वाईट परिणाम हा शरीरावर होतो.

हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यास हृदयाचे ठोके वाढतात. व सतत धाप लागण्याचा त्रास व्हायला सुरुवात होते. जर याकडे लवकर लक्ष नाही दिल्यास पुढे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

लहान मुलांची वाढ खुंटते :– लहान मुलांच्या पुरेशा वाढीसाठी व शरीर विकासासाठी योग्य प्रमाणात हिमोग्लोबिनची गरज असते पण हिमोग्लोबिन व रक्ताच्या कमतरतेमुळे पुरेसे पोषण न झाल्यास शरीरात रक्तक्षय होऊन लहान मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे जर लहान मुलांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी होत असेल तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा आणि पुढील तपासणी करून घ्यावी.

त्वचा पांढरट किंवा पिवळसर दिसू लागणे :– शरीरातील रक्तामुळे व हिमोग्लोबीनमुळे आपल्या त्वचेला लाल रंग प्राप्त होतो. मात्र शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा पांढरट दिसू लागते.

जर रक्तात हिमोग्लोबिन कमी झाले तर त्वचा पिवळट किंवा पांढरट पडू लागते. जर आपली त्वचा देखील अशी होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.

थकवा, दृष्टिदोष, अशक्तपणा :- तुम्ही जे खातात त्यापासून रक्त बनते तेच पोषक घटक तुमचे शारीरिक कार्य व्यवस्थित  पार पाडतात पण जेव्हा शरीरातील रक्त कमी होते तेव्हा ते पोषक न घटक मिळाल्याने तुम्हाला थकवा व अशक्तपणा जाणवतो. त्याच प्रमाणे डोळ्यांना देखील योग्य प्रमाणात रक्त न मिळाल्याने दृष्टीवर याचा विपरीत परिणाम होतो.

 अनेमिया आजाराचे निदान कसे करावे

अॅनिमियाचे निदान : – अनेमिया आजाराचे निदान हे रुग्णाच्या शारीरिक लक्षणे यांवर पण अवलंबून असतात. पण हे निदान क्लिनिकल असून त्याकरिता काही रक्त तपासण्या आवश्यक आहे. अनेमिया आजार हा गंभीर नसला तरी या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

अनेमिया आजाराचे निदान पुढीलप्रमाणे :- C.B.C (Complete Blood Count):- ह्यामध्ये लाल रक्त पेशींची (RBC) संख्या, लोह (Hb) तत्वाचे प्रमान, हिमॅटो कीट चे प्रमाण तपासले जाते.कधी कधी अनेमियाच्या निदानासाठी मलमूत्राची  देखील चाचणी करावी लागते.

हिमोग्लोबिनचे नॉर्मल प्रमाण किती असावे ?

  •  पुरुष: १३.५ ते १७.५ g/dL

  •  स्त्रिया: १२.० ते १५.५ g/dL

  •  गर्भवती स्त्रिया : ११ ते १४ g/dL

  •  शाळेत जाणारी मुले : ६ ते १२ वर्षे : ११.५ ते १५.५ g/dL

  •  ६ महिने ते ६ वर्षांची मुले : ११ ते १४ g/dL

 

 

 

अनेमिया वरील वैदकीय उपचार : जर अधिक काळापर्यंत अनेमिया ची स्थिती राहिल्यास शरीरात अशक्तपणा निर्माण होतो व कार्य करण्याची क्षमता कमी होते आणि त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

अशा वेळी वैद्यकीय तपासण्या व उपचाराची गरज असते. त्यामध्ये डॉक्टर औषधे, व्हिटॅमिन दिले जाते. कधी कधी रुग्णाला रक्त कमी झाल्यास रक्त चढवले जाते. कधी कधी श्वास व्हायला त्रास झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा हि केला जातो.

आता आपण अनेमिया आजारावर कोणता आहार घ्यावा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

अनेमिया आणि आहार :- जर आपणास अनेमिया असेल तर आपणास रोजच्या जेवण न घेता वेगळा आहार घ्यावा लागेल.

अनेमिया आजारावर आहार पुढीलप्रमाणे:-

  • शरीराला पाण्याची गरज असते. पाण्यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. त्यामुळे आहारात विविध प्रकारच्या भाज्या, फळांचे रस घेणे महत्वाचे आहे. त्यात बिट, गाजर,डाळिंब, लिंबू अश्या फळांचा रस घेतल्याने तुमच्या शरीराची झालेली झीज भरून निघते.

 

 

 

 

  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचे प्रमाण वाढवणे जसे की मेथी, पालक अश्या भाज्या. पालक चा सूप अनेमिया झालेल्या लोकांनी जर १ महिना रोज १ वाटी जर सेवन केले तर त्यांचे हिमोग्लोबिन हि वाढण्यात नक्कीच मदत होते.

 

 

 

 

  • अनेमिया मुळे  शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते त्यामुळे कोणतेही इन्फेकशन किंवा कोणताही आजार पटकन होऊ शकतो अशा वेळेस आपल्या आहारात जर व्हिटॅमिन सी चा वापर केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत होईल.

 

 

 

 

  • काळ्या मनुका आणि खजूर या दोन्ही सुक्यामेव्यांमध्ये व्हिटॅमिन क चे आणि लोहाचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे रोज १-२ खजूर, ४-५ मनुका रोज खाल्ल्याने शरीराची झीज भरून निघते.

  • लोखंडाच्या भांड्यात/कढईत भाजी करायची किंवा लोखंडाच्या तव्यात चपाती किंवा भाकरी बनविणे त्यातून शरीराला लोह मिळते.

  • तीळ दोन-तीन तास पाण्यात भिजवून ठेवावे व त्याची नंतर पेस्ट करून ती ती पेस्ट मधासोबत घेतल्याने शरीराला चांगला फायदा होतो.

  • केळी,डाळ,मटार,शेंगदाणे,काळे फुटाणे,अंडी,दूध,सिगिझ,मांस,मासे,सोयाबीन यांचे सेवन करावे.

  • सफरचंदाचे दररोज सेवन करावे.

लोहाच्या कमतरतेमुळे अनेमिया आजार होऊ शकतो.

अनेमिया साठी आपण हिरवी पालेभाज्या, फळ, यांचे सेवन वाढवावे.

Devyani Sonar

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

5 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

6 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

15 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago