नाशिक

गुजरातमधून आलेली 2,155 किलो बर्फी जप्त

अन्न प्रशासनाचा कारवाईचा धडाका

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. कारवाईचा धडाका लावला आहे. गुजरातमधून नाशिकमध्ये अवैधरीत्या आलेली दोन हजार 155 किलो स्पेशल स्वीट बर्फी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त करून नष्ट केली.
या बर्फीची किंमत पाच लाख 58 हजार 267 रुपये आहे. द्वारका येथे शुक्रवारी (दि. 11) पहाटे दोन खासगी बसमधून हा साठा शहरात आणला जात असताना ही कारवाई करण्यात आली.
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेंंतर्गत गुजरातमधून नाशिककडे येणार्‍या विजय आणि बलदेव या दोन खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बर्फीचा साठा आढळून आला.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदीनुसार तपासणी केली असता, बर्फीची वाहतूक अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना करण्यात येत असल्याचे आढळले. तसेच अन्नपदार्थाच्या वाहतुकीसाठी आवश्यक तापमानाची अटही पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण साठा जप्त करून नष्ट केला. सणासुदीच्या काळात मिठाई व अन्य खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर बाहेरच्या राज्यांतून येणार्‍या खाद्यपदार्थांच्या वाहतुकीवरही प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अन्नपदार्थाची गुणवत्ता, साठवणूक आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त अन्न मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त अन्न विनोद धवड व संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड, सुहास मंडलिक, संकेत येलमामे, वैभव गर्दे, चेतन परदेशी, अक्षय गाडेकर, अश्विनी पाटील आणि ऋतुजा नवले यांच्या पथकाने कारवाई केली.

2,155 kg of barfi from Gujarat seized.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गावातून धिंड : ’नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला’च्या दिल्या घोषणा

मखमलाबाद येथे डॉक्टरला मारहाण, दोन आरोपींना अटक पंचवटी : प्रतिनिधी मखमलाबाद बसस्टँड परिसरात भाजीपाला घेण्यासाठी…

14 hours ago

बायकोच्या वाढदिवसाचे नाटक करून गल्ला लंपास

पुण्याचा सराईत चोर उपनगर पोलिसांच्या जाळ्यात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी बायकोचा वाढदिवस आहे; चांगले कपडे…

14 hours ago

भविष्यात ‘एआय’ उठणार माणसाच्या जीवावर?

कमांड न स्वीकारता स्वतःच्या बुद्धीने घेणार निर्णय; मानवी अस्तित्वाला धोक्याचा इशारा मुंबई : प्रतिनिधी आर्टिफिशियल…

14 hours ago

हरितालिका पूजनानंतर होणार श्रीगणेशाचे आगमन

31 वर्षांनंतर दुर्मिळ योग; सकाळी पूजन, मध्यान्ही बाप्पाची स्थापना नाशिक : प्रतिनिधी हरितालिकेची पूजा आणि…

14 hours ago

सातशेपैकी 20 गणेश मंडळांनाच परवानगी

प्रमाणपत्राची पूर्तता न झाल्याने अर्ज प्रलंबित नाशिक : प्रतिनिधी महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवाच्या…

14 hours ago

विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया राबवा

मनपा पाठवणार विभागीय आयुक्तांना पत्र नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेची निवडणूक जानेवारीत झाल्यानंतर ऑगस्टमध्ये महिला…

15 hours ago