नाशिक

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिन्नरला भव्य शोभायात्रा

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि भगवेमय वातावरणात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुरुवारी (दि.19) सिन्नर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक सोहळ्याने आणि उत्साहात सहभागाने ही शोभायात्रा सिन्नरकरांचे विशेष आकर्षण ठरली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी सात वाजता चाळीस उंच गुढी उभारून शोभायात्रेला सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुढीची विधिवत पूजा करण्यात आली.
शोभायात्रेत पारंपरिक गणेश पालखी, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, स्कूटी रॅली, नवनाथ, वासुदेव, वीर, लाठीकाठी, रामसीता चित्ररथ, झांजपथक, गोंधळी, भजनी मंडळ, संबळ आणि पिपाणी अशा विविध लोककलांचा समावेश होता. विविध सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या कलाप्रदर्शनामुळे संपूर्ण वातावरण मराठीमय झाले. गुढीची पूजा नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, सिन्नर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, भाजपाचे उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, गटनेते सागर भाटजिरे, मनोज देशमुख, नगरसेवक उदय गोळेसर, ललिता हांडे, मनीषा गवळी, प्रा. राजाराम मुंगसे, दत्तात्रय हांडे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.
शारदा महिला मंडळ, गुजराती महिला मंडळ, क्षत्रिय महिला मंडळ तसेच विविध ढोल पथकांनी उत्साहात सहभाग घेतला. सिन्नरमधील माता-भगिनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून शोभायात्रेत
सहभागी झाल्या.
सिन्नर महाविद्यालयासह लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, मातोश्री चांडक कन्या विद्यालय, मातोश्री निर्मला कुलकर्णी विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, शेठ ब. ना. सारडा विद्यालय आदी शैक्षणिक संस्थांनीही सहभाग नोंदवला.
वनप्रस्थ फाउंडेशन, ढग्या डोंगर समिती, वृक्षमित्र फाउंडेशन, सिन्नर नगरपालिका, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि सिन्नर सायकलिस्ट ग्रुप यांनी चित्ररथांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पालखीसमोर रस्त्यावर रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
मातोश्री नर्मदा लॉन्स येथे सहभागी मंडळांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सिन्नर सांस्कृतिक मंडळाचे प्रकाश नवसे, मनोज भंडारी, संतोष शेलार, डॉ. महावीर खिंवसरा, अमोल चव्हाण, अमोल बोर्‍हाडे, संजय गंगावणे, सुरेश नावंदर, सुहास देशपांडे, सुनील चकोर आदींसह नागरिक उपस्थित झाले होते.

नगराध्यक्षांचे खंजिरी वादन आणि लाठीकाठी

नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी होत लाठीकाठी मर्दानी खेळ खेळला. त्याचप्रमाणे वाघे मंडळाच्या ग्रुपमध्ये सहभागी होत ‘अंबे गोंधळाला ये’ या गोंधळी गीतावर स्वतः खंजिरी वादन करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

पौराणिक चित्ररथ ठरले आकर्षण

शोभायात्रेत राम-लक्ष्मण-सीता यांचा चित्ररथ तसेच दूरचित्रवाणी कलाकार संजय गंगावणे यांनी साकारलेला नवनाथ विशेष आकर्षण ठरला. नृत्यगटांनी मराठी गीतांवर सादर केलेल्या नृत्याने वातावरण आणखी रंगतदार केले. शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी विविध मान्यवर व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजाराम मुंगसे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राध्यापक जावेद शेख यांनी केले.

A grand procession to Sinnar on the occasion of Gudi Padwa

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

20 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

21 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

21 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

21 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

21 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

21 hours ago