वेधशाळेतून हवामानाचा अंदाज दिला जातो, तो निसर्गातील दिसणार्या बदलातून. निसर्गात होत असलेल्या घडामोडीतून. दिवसेंदिवस अरबी समुद्र, बंगालचा उपसागर या ठिकाणी तापमान वाढत आहे, त्यामुळे पावसाच्या वेळेतही बदल होतो आहे. कधी अतिवृष्टी होते, तर कधी पावसाची वाट पहावी लागत आहे. मान्सून कधी वेळेवर दाखल होतो तर कधी खूप उशिरा येतो. हा सगळा बदल निसर्गातील झालेल्या बदलामुळे होत आहे.
जशी वेधशाळा हवामानाचा अंदाज देते, तशा अंदाज ग्रामीण भागातील जुन्या जाणत्या शेतकर्यांना देखील येतो. कारण भारतीय शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे, निसर्गावर अवलंबून आहे. पक्षांचे घरटे, झाडांचे फुले, फळे येणे, बहार येणे अशा निसर्गातील अनेक घडणार्या घटना यातून शेतकर्यांना निसर्गाचा अंदाज येत असतो.
निसर्गातील होणारे बदल आणि हवामानाचे अंदाज यावरच वृक्षारोपण असेल शेतातील पेरणी असेल याचे सुरळीत नियोजन करावे लागते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. ते कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही. ते काळ्या आईच्या उदरातच पिकते. त्यामुळेच निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
निसर्गाचे संवर्धन केले तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे पर्जन्य पडत राहील ! शेती व्यवसाय सुरळीत सुरू राहील ! अन्नधान्य देखील पिकत राहील, आणि मानवाची गरज पूर्ण होईल ! मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात निसर्गाचे महत्व आहे.
निसर्ग त्याच्या नियमाप्रमाणे सर्व काही सुरळीत करत असतो. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात जास्त बदल होत असतो. जर निसर्गात बदल केला नाही तर तापमान मर्यादित राहील त्यानुसार हवामान अंदाज देखील बरोबर येत राहतील. सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे सॅटेलाइट व्यवस्था आहे, तरी देखील कितीतरी वेळा हवामानाचे अंदाज चुकतात. पण जोपर्यंत मानवाचा हस्तक्षेप निसर्गात नव्हता तेव्हा शेतकर्यांना सुद्धा अंदाज येत होता. त्या अंदाजानुसार पाऊस पडत होता. त्यामुळे निसर्गावर अत्याचार करू नये. कुठेतरी मानवी हस्तक्षेप थांबवावा.
इतरही प्राणी, पक्षी राहतात त्यांचेही जीवनमानात बदल होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची, कितीतरी पक्षांची निसर्गात देखील संख्या कमी होत आहे. वेळेत पाऊस न पडल्याने लागवड केलेली झाडे कितीतरी वेळा जळून जात आहेत. निसर्ग म्हणजेच देवता त्या देवतेचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निसर्गात मानवी हस्तक्षेपाने बदल झाले नाही तर अंदाज बरोबर येतील आणि त्याच अंदाजाने निसर्गचक्र सुरळीत सुरू राहील.
Changes in Nature and Weather Forecasts
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik