हजारोंची गर्दी, पाणी-शौचालयाच्या अभावामुळे कामगार संतप्त
नाशिक : प्रतिनिधी
श्रमिकनगर, पाइपलाइन परिसरातील फाशीच्या डोंगराशेजारी सुरू असलेल्या बांधकाम कामगार गृहोपयोगी संच वितरण केंद्रावर प्रचंड अव्यवस्था निर्माण झाली आहे. हजारो कामगारांच्या गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची कोणतीही सुविधा नसल्याने कामगारांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दररोज केवळ पाचशे लाभार्थ्यांना अपॉइंटमेंट दिली जात असतानाही प्रत्यक्षात वेळेवर किट वितरण होत नसल्याने कामगारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. सकाळी सहापासून नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले कामगार रांगेत उभे राहत असले, तरी अनेकांना दिवसभर थांबूनही किट मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असताना पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे महिलांसह सर्व कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. उन्हात उभे राहून प्रतीक्षा करणार्या कामगारांनी ‘अपॉइंटमेंट असूनही वेळेवर किट मिळत नाही, मूलभूत सुविधा नाहीत, मग आम्ही काय करायचे?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला. दरम्यान, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष हेमंत जनार्दन नेहेते यांनी घटनास्थळी भेट देत कॉन्ट्रॅक्टरच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची तंबी दिली. कामगार आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केल्यास कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
याप्रकरणी कामगार उपयुक्त विकास माळी यांच्याकडून नेमकी कोणती कार्यवाही केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी वेंकटेश मोरे, निखिल पाटील, विवेक बिराडे, अनिकेत कदम, प्रकाश बांधेकर, मंगेश क्षीरसागर आणि किरण काळे यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
Disarray at kit distribution center
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…
सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…