नाशिक

म. फुले जयंती मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त शहरात आज, दि. 11 एप्रिल रोजी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) यांनी अधिसूचना जारी केली आहे.
ही मिरवणूक मुंबई नाका सर्कल येथून सुरू होऊन सारडा सर्कल, दूधबाजार चौक, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, दहीपूल, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, गाडगे महाराज पूल, मनपा शाळा क्रमांक 30 ते महात्मा फुले पुतळा या मार्गाने जाणार आहे. त्यामुळे दुपारी तीनपासून मिरवणूक संपेपर्यंत या संपूर्ण मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना (मिरवणुकीतील वाहने वगळता) प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग याप्रमाणे
द्वारकाकडून येणारी वाहने मुंबई नाका सर्कलमार्गे इंदिरानगर बोगदा, आर. डी. सर्कल, सिटी सेंटर मॉल सिग्नलमार्गे वळविण्यात येतील.
इंदिरानगर बोगद्याकडून येणारी वाहतूक मुंबई नाका सर्कलमार्गे महात्मा फुले पुतळ्याच्या मागून वडाळा नाका दिशेने वळविण्यात येईल.
सीबीएसकडून येणारी वाहने गडकरी सिग्नल, चांडक सर्कलमार्गे पुढे जातील.
मेनरोडकडे जाणारी वाहतूक नेपाळी कॉर्नर, शालिमार, सीबीएसमार्गे वळविण्यात येईल.
गाडगे महाराज पुलाकडे जाणार्‍या वाहनांसाठी सप्तशृृंंगीदेवी मंदिर, अमरधाम रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध राहील.

वाहतूक निर्बंधातून या वाहनांना सूट
वाहतुकीचे निर्बंध पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत. परिस्थितीनुसार मिरवणुकीदरम्यान वाहतुकीत आणखी बदल करण्याचा अधिकार पोलिसांनी राखून ठेवला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

m. Changes in traffic routes due to Phule Jayanti procession

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

7 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

13 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

19 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

24 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

39 minutes ago

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

46 minutes ago