नाशिक

मक्तेदार-नगरसेवकांत कुठलाच वाद नाही

शहर अभियंत्यांच्या पत्रामुळे उलटसुलट चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कामांना अडथळे येत असल्याची तक्रार कंत्राटदाराने केल्यानंतर शहर पोलिसांनी गुरुवारी नगरसेवकांसह व काही झेरॉक्स नगरसेवकांना चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावले होते. यानंतर शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, सदर प्रकरण ताजे असतानाच, मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सायंकाळी पत्र काढत सदरची कामे त्या त्या परिसरात तेथील नगरसेवकांच्या सहकार्याने होत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील दोघा नगरसेवकांसह झेरॉक्स नगरसेवकांनी कंत्राटदाराला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने थेट मनपा आयुक्त यांना पत्र देत कामाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका क्षेत्रात विविध कामे सुरू आहेत. सदरची कामे त्या त्या परिसरातील विविध सन्माननीय सदस्यांचे सहकार्य तसेच समन्वय साधून प्रगतीत आहेत. सन्माननीय सदस्य, अधिकारी आणि कामाचे मक्तेदार यांच्या समन्वयाने सदरची कामे विहित पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे प्रगतीत आहेत. सन्माननीय सदस्य आणि मक्तेदार यांच्यात कुठल्याही प्रकारचा गैरसमज नसल्याने शहर अभियंत्यांनी
म्हटले आहे.
गुरुवारी झालेल्या स्थायी सभेत नगरसेवक राहुल दिवे यांनी ठेकेदार हे प्रशासनाच्या मदतीने नगरसेवकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही तासांनीच पोलिसांनी सिंहस्थ कामात अडथळा करणार्‍यांना पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सिंहस्थ कामातील अडथळे खपवून घेतले जाणार नसल्याचा सज्जड दम देत संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

There is no dispute between the monopolist and the municipal workers.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago