मुंबई नाका परिसरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको : प्रतिनिधी
जुन्या आर्थिक व्यवहारातून पाच लाख रुपयांची मागणी करून चाकूचा धाक दाखवत एक लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतल्याचा प्रकार मुंबई नाका परिसरात घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात छाया जयप्रकाश सेन व समीर पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश सत्यनारायण चांद (वय 56, , रा. न्यू कालिका अपार्टमेंट, श्रीहरी कुटे मार्ग, नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सन 2019 पासून छाया सेन हिने वेळोवेळी त्यांच्याकडून नऊ लाख 97 हजार रुपये घेतले. मात्र, घेतलेली रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. पैसे परत मागू नयेत यासाठी छाया सेन हिने समीर पठाणशी संगनमत करून चांद यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी करून दबाव आणला. समीर पठाण याने शिवीगाळ व मारहाण करून चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि एक लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, छाया सेन आणि समीर पठाण मुंबई नाका येथील श्रीहरी कुटे मार्गावरील चांद यांच्या कार्यालयात आले. यावेळी समीर पठाण याने चांद यांना मारहाण करून जीवे मारण्याची भीती दाखवली. दुसर्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दोघांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यांपैकी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या नोंदीनुसार संशयितांपैकी एकाच्या विरोधात यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख व पोलिस निरीक्षक पंडित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Extorted one lakh rupees after demanding a ransom of five lakhs.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…