राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

ब्रिटनच्या वरिष्ठ सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदेंचा सन्मान

लंडन : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडन येथील ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच ’हाउस ऑफ लॉर्डस्’मध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या ’कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासकीय पातळीवर राबवलेल्या लोकोपयोगी विकासकामांची आणि पारदर्शक प्रशासनाची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेले भाषण उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मायबोली मराठीतून केली आणि कविवर्य सुरेश भट यांच्या ’लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ या कवितेच्या प्रसिद्ध ओळींचा अभिमानाने उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी आपला उर्वरित संवाद इंग्रजीतून साधला असला, तरी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती देताना त्यांनी ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ’शासन आपल्या दारी’ या दोन योजनांची नावे बदल न करता थेट मराठीतच घेतली. याच कल्याणकारी योजनांमुळे आणि नागरिकांना थेट सेवा देण्याच्या दृष्टिकोनामुळे आज जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या कारभाराला मोठी मान्यता मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आई, पत्नीसह राज्यातील जनतेला पुरस्कार समर्पित
हा आंतरराष्ट्रीय आणि प्रतिष्ठेचा बहुमान स्वीकारताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या आशीर्वादांना आणि आपल्या आई व पत्नीच्या काबाडकष्टातून मिळालेल्या संस्कारांना समर्पित केला. तसेच मुंबई आणि लंडन या दोन्ही जागतिक वित्तीय केंद्रांमधील सहकार्यावर भर देत, आगामी काळात महाराष्ट्र आणि ब्रिटन एकत्र येऊन फिनटेक, ग्रीन एनर्जी आणि कौशल्य विकास यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत मोठी झेप घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Deputy Chief Minister Shinde Honoured in Britain’s Upper House

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राजधानीतील गणेशोत्सवाची धूम

राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्‍या कार्यक्रमांची…

34 minutes ago

बाप्पा मोरया रे…

पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला…

37 minutes ago

पिंजर्‍यातील कुत्र्यावर बिबट्याची झडप

सीसीटीव्हीत थरार कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के…

41 minutes ago

प्रतिबंधित गुटखा, तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक पकडला

12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…

44 minutes ago

गौरी-गणपतीसाठी नाशिकच्या 149 एसटी बसेस कोकणात

जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…

1 hour ago

अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…

1 hour ago