नाशिक

दुष्काळाच्या छायेत पाणी सोडलेच कसे?

कदम : नांदूरमध्यमेश्वरच्या पाणी विसर्गाची चौकशी करा

नाशिक : प्रतिनिधी
नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातील मोठ्या प्रमाणातील पाणी सोडण्याच्या निर्णयावरून निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शासन आणि जलसंपदा विभागाला धारेवर धरले आहे. निफाडची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची, शेतीची आणि पशुधनाची गरज सुरक्षित न करता हजारो क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी अनिल कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निफाड, चांदवड आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश अलीकडेच देण्यात आले आहेत. त्यामुळे निफाडमधील पाणीस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज असताना उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे होणे अपेक्षित असल्याचे अनिल कदम यांनी म्हटले आहे.
निफाडच्या शेतकर्‍यांच्या डोळ्यांसमोर पिके करपत असताना आणि पाण्याची चिंता वाढलेली असताना उपलब्ध पाणी बाहेर सोडण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला? असा थेट सवाल अनिल कदम यांनी उपस्थित
केला आहे.
नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातील पाणी हे जनतेचे सार्वजनिक संसाधन असून, त्याच्या वापराबाबत स्थानिक गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुधन, आगामी हंगामातील पाण्याची गरज आणि पर्यावरणीय आवश्यकता यांचा सर्वंकष विचार केल्याशिवाय मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
नांदूरमध्यमेश्वरमधून पुढील पाणी विसर्ग करण्यापूर्वी निफाड तालुक्यासाठी आवश्यक किमान जलसाठा निश्चित करून तो सुरक्षित ठेवावा. तसेच आगामी पाणी आवर्तनाचे पारदर्शक नियोजन जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. निवेदनाच्या प्रति जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जलसंपदा विभागाला पाठवले आहे.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय दबावापोटी निफाडचे पाणी नगरला पळविले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांना दूरध्वनीद्वारे जाब विचारला आहे. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाने हा विसर्ग केल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, निफाड तालुक्याच्या पाण्याची गरज डावलून यापुढे अनियंत्रित पाणी सोडण्यात आले तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल.
– अनिल कदम, माजी आमदार, निफाड विधानसभा

How could water be released while under the shadow of drought?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago