नाशिक

पावसाअभावी मका, सोयाबीन, द्राक्षबागा करपल्या

रामपूर शिवारात पाहणी; दुष्काळग्रस्त यादीत निफाडचा समावेशाची मागणी

निफाड : विशेष प्रतिनिधी
शासनाच्या आदेशानुसार दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्याच्या पार्श्वभूमीवर, निफाड तालुक्यातील रामपूर शिवारात स्थानिक प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन विविध पिकांची पाहणी केली. पावसातील मोठा खंड, अपुरी सिंचन व्यवस्था आणि पाण्याअभावी पिकांच्या वाढीवर झालेला प्रतिकूल परिणाम यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे निफाड तालुक्याचा तात्काळ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी जोरदार मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
रामपूर शिवारात कामगार तलाठी शंकर खडांगळे, सहायक कृषी अधिकारी ज्योती भड, ग्रामसेवक उज्ज्वला भोईर, पोलीसपाटील संजय तळेकर, कृषिमित्र मोतीराम भवर तसेच लोकप्रतिनिधी राजेंद्र बोरगुडे, दादा बोरगुडे व वाल्मीक बोरगुडे यांच्या उपस्थितीत पिकांची पाहणी करण्यात आली. या पथकाने परिसरातील मका, सोयाबीन, टोमॅटो तसेच द्राक्षबागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
निफाड तालुका हा प्रामुख्याने शेतीप्रधान असून, येथे द्राक्ष, कांदा, मका आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन
घेतले जाते.
मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. ज्या भागात सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध नाही, तेथील शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. आवश्यक कालावधीत पाऊस न मिळाल्यामुळे मका व सोयाबीनची वाढ खुंटली आहे, तर जमिनीत ओलावा नसल्याने द्राक्षबागांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मर्यादित पाणीसाठ्यामुळे प्रत्येक पिकाला पुरेसे सिंचन करणे शक्य नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.

प्रशासनस्तरावरील कारवाईला वेग

पावसाचा खंड, अपुरी सिंचन व्यवस्था आणि पिकांचे झालेला अतोनात नुकसान यांचा वस्तुनिष्ठ पंचनामा करून निफाड तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून होत असलेल्या या पाहणी अहवालाला विशेष महत्त्व असून, यामुळे शेतकरीवर्गाला शासनाच्या संभाव्य सवलती व मदतीचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने शासन दरबारी तातडीने योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maize, soybean, and grapevines have withered due to the lack of rain.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago