पोलिसांनी परवानगी नाकारली
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे धडक मारण्याच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या वतीने पोलिसांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. मात्र, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी या आंदोलनास स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारली आहे. आंदोलनामुळे दक्षिण मुंबई परिसरातील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालये, सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या बाबी बाधित होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, आपण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. ‘न्यायदेवता आपल्या बाजूने आहे, त्यामुळे परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन होणारच’, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी, निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप, गॅझेटियरची अंमलबजावणी, मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Jarange firm on Mumbai protest
12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…
जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…
सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…
मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून,…
पालक, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; यूपीएससी विद्यार्थ्यांना खड्डे, ट्रॅफिकचा मोठा फटका नाशिक : प्रतिनिधी यूपीएससी परीक्षेच्या…
सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी सायंकाळी एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…