नाशिक

पाणीपुरवठ्याच्या समस्येवर आमदार देवयानी फरांदे आक्रमक

गंगापूर रोड परिसरातील पाण्याची टाकी सर्वप्रथम
भरण्याचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 7 मधील माणिकनगर परिसरातील शिवसत्य क्रीडासंकुल येथे नाशिक महानगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या विनंतीवरून आमदार देवयानी फरांदे, नगरसेविका स्वाती भामरे व नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. साळी उपस्थित होते. आमदार देवयानी फरांदे यांनी परिसरातील अनेक घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाणीपुरवठ्याची पाहणी केली. तसेच पाण्याचे मीटर काढून प्रत्यक्ष पाण्याचा दाब तपासला असता अपेक्षित दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत आमदार फरांदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून याबाबत कारणे स्पष्ट करून घेतली. सदर पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने टाकी नियमित भरली जात होती. मात्र, सातपूर विभागातील पाण्याच्या टाक्या प्रथम भरल्या जात असल्याने माणिकनगर परिसरातील टाकी पुरेशा प्रमाणात भरली जात नसल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. यावर आमदार फरांदे यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा धोरणानुसार दूर अंतरावरील पाण्याच्या टाक्यांना प्राधान्याने पाणी भरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. “नागरिकांना पाणी मिळत नसताना टाकी भरण्याच्या क्रमात अशा प्रकारची विसंगती खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी उद्यापासून गंगापूर रोड परिसरातील पाण्याची टाकी सर्वप्रथम भरण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले.
नाशिक शहरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ही बाब गंभीर असून, प्रशासनाने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी दिला. नागरिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या या पाहणीमुळे माणिकनगर परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

MLA Devyani Farande takes an aggressive stance on the water supply issue.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago