नाशिक

त्र्यंबकेश्वरमधील विविध विकासकामांना गती द्या

मंत्री महाजनांकडून पाहणी; भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी पाहणी दौर्‍यात आढावा घेतला. दर्शनपथ, त्र्यंबकेश्वर मंदिर, गोदावरी नदी, कुशावर्त तीर्थ तसेच तालुका मध्यवर्ती इमारतीच्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकार्‍यांना कामे वेळेत आणि
दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक, साधू-संत, महंत व विविध आखाडे त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता, वाहतूक, स्वच्छता आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कोणत्याही परिस्थितीत भाविकांना अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी दिले.
कुशावर्त तीर्थ येथे मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत असल्याने गर्दीचे प्रभावी नियोजन करावे. त्र्यंबकेश्वर परिसरात दर्शनपथ, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अतिक्रमणे हटविणे, नाले बांधणे, विद्युत व्यवस्था, घाटांची उभारणी, फरशी बदलणे तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या सर्व कामांना गती देतानाच कामांचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्याच्या सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या. प्रारंभी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती इमारतीच्या कामाची पाहणी केली. मध्यवर्ती इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करताना बांधकामाची गुणवत्ता व दर्जा यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मंदिर परिसरातील विविध कामे मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ असताना पूर्ण करणे अडचणीचे ठरत असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिर काही कालावधीसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत विश्वस्त मंडळाशी चर्चा
केली आहे. मंदिरातील पूजा-अर्चा सुरू ठेवून भविष्यात भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. अंतिम तारीख विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतर निश्चित करण्यात येणार आहे. भाविकांना निर्णयाची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, एमएसआयडीसीच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह मंदिर संस्थानचे विश्वस्त आदी उपस्थित होते.

Accelerate the various development works in Trimbakeshwar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago