नाशिक

कुंभच्या कामांत चूक दाखवा, मी नाव बदलून टाकेन

महापालिका आयुक्त खत्रींचे टीका करणार्‍यांना आव्हान

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थाच्या कामांमध्ये कुठेही तडजोड झालेली नाही आणि होणारही नाही. आम्ही कामांवर कठोर पद्धतीने लक्ष ठेवून आहोत. सोशल मीडियावर काय विकास सुरू आहे, असा प्रश्न विचारला जातो. माझे सर्वांना उघड आव्हान आहे, की कुंभच्या कामांत एक चूक काढून दाखवा, मी माझे नाव बदलेन, असे विधान नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, की कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होतील.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या रस्ते आणि पायाभूत सुविधा कामांवरून सुरू असलेल्या टीकेला आयुक्त खत्री यांनी उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, सिंहस्थाच्या कामांमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही. रस्त्यांच्या कामांसाठी आम्ही एम40, एम60 पर्यंतची सिमेंट स्ट्रेंथ दिलेली आहे. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाने या रस्त्यांच्या कामांची आणि दर्जाची पाहणी केली. एवढ्या चांगल्या दर्जाची कामे आम्ही कुठे पाहिली नाहीत, असे आयआयटीच्या पथकाने आम्हाला सांगितले आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय असल्याचे म्हटले. सिंहस्थ कामांच्या निविदा प्रक्रियेबाबत व दर्जाबाबत विरोधकांनी पुराव्यासह चूक दाखवून द्यावी, असे आव्हान त्यांनी टीका करणार्‍यांना दिले. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 1,230 कोटी खर्चून 29 रस्त्यांची कामे सुरू आहेत. सोबतच पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि रस्ते मिळून जवळपास पाच हजार कोटींचे कामे सुरू आहेत.परंतु या कामांच्या दर्जाबाबत सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातून टीका करून महापालिकेला लक्ष्य केले जात आहे. निविदांवरही आक्षेप घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त खत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

विकासकामांत पारदर्शकता
त्यांनी चूक काढून दाखवावी. आम्ही कुठे चुकलो आहोत ते शोधून दाखवावे. त्यानंतर आम्ही योग्य की अयोग्य हे लोकांच्याच लक्षात येईल, असे आयुक्त खत्री यांनी सांगत भूमिका मांडली. सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेबाबत आपण कोणतीही तडजोड केलेली नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मनपाची निविदा कागदपत्रे वेबसाइटवर टाकली आहेत. कामांमध्ये पूर्णत: पारदर्शकता ठेवली आहे. ज्यांना तपासायचे आहे त्यांनी जरूर कामे तपासावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली.

Point out a flaw in the Kumbh-related work, and I will change my name.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago