पोलिसांच्या तत्परतेने तरुणीचा जीव वाचला; दहा-पंधरा मिनिटांचा थरार
निफाड : तालुका प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत टोलनाक्याजवळील कादवा नदीकाठावर 19 वर्षीय तरुणीने नदीत उडी मारण्याची धमकी दिल्याने सोमवारी (दि. 7) सायंकाळी काही काळ खळबळ उडाली. काठावर उभी राहून तरुणी ‘मी नदीत उडी मारेन’ असे सांगत असल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलिसांना माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दहा-पंधरा मिनिटांच्या मनधरणीनंतर तरुणीने अचानक नदीत उडी घेतली. पोलिस व स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने नदीपात्रात धाव घेत तिला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सोमवारी सायंकाळी कादवा नदीच्या काठावर येऊन उभी राहिली होती.
ती नदीत उडी मारण्याची धमकी देत असल्याने उपस्थित नागरिकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, घटनेची माहिती पिंपळगाव बसवंत पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी तत्काळ पोलिस पथकाला घटनास्थळी रवाना केले. पोलिसांचे पथक पोहोचल्यानंतरही तरुणीची मनधरणी सुरू होती. मात्र, कोणाचेही न ऐकता तिने अचानक कादवा नदीच्या पाण्यात उडी घेतली. तरुणीने उडी घेताच पोलीस कॉन्स्टेबल नितीन गाढवे व विकास वाळुंज यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात धाव घेतली. प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्यात काही वेळातच तरुणीला पाण्याबाहेर काढण्यात यश आले.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर परिसरात ‘उडी मारतो’ अशी धमकी देत एका तरुणाने दरीत उडी घेतली होती. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडीलही दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
या पार्श्वभूमीवर कादवा नदीकाठावरील घटनेने उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि स्थानिक नागरिकांचे धाडसी सहकार्य यामुळे यावेळी अनर्थ टळला.
समुपदेशन करून कुटुंबीयांच्या स्वाधीन
तरुणीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी तिच्याशी संवाद साधून समुपदेशन केले. त्यानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. तरुणीने नदीत उडी मारण्याचा निर्णय का घेतला, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. पोलिसांची तत्परता, कॉन्स्टेबल नितीन गाढवे व विकास वाळुंज यांचे धाडस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे एका तरुणीचा जीव वाचला.
Young woman jumps into Kadva River.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…