राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

विदर्भात सरी बरसणार; उर्वरित महाराष्ट्र कोरडाच!

मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाब क्षेत्रामुळे येत्या आठवडाभरात ईशान्य आणि पूर्व भारतात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या अनुमनानुसार, या संभाव्य हवामान प्रणालीमुळे छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भातील क्षेत्रात पावसाच्या सरी बरसू शकतात, उर्वरित महाराष्ट्रात मात्र आगामी काही दिवसांत पावसाची फारशी काही चिन्हे दिसत नाहीत.
बंगालच्या उपसागरावर उत्तरेकडे संभाव्य कमी दाब क्षेत्र सक्रिय होत आहे. या प्रभावाने, पुढील आठवडाभर ईशान्य भारत, पूर्व उत्तर आणि प्रदेश पश्चिम हिमालयी क्षेत्रात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ओडिशा आणि लगतच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवडाभरात वायव्य भारत, पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या मैदानी प्रदेशात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात 16 ते 20 जुलै दरम्यान तुरळक ते विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही 16 ते 17 जुलै दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकेल. त्यानंतर 18 ते 20 जुलै दरम्यान मात्र छत्तीसगडमध्ये सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात 16 ते 18 जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना होईल. यावेळी विजांचा कडकडाट तसेच आणि 40-50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. काही भागात 60 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा राहण्याचा इशारा दिला आहे.

विदर्भात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता

विदर्भात 16 ते 20 जुलै दरम्यान तुरळक ते विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. 17-18 जुलै दरम्यान विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 16-18 जुलै दरम्यान छत्तीसगडमध्येही तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या काळात छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Showers expected in Vidarbha; the rest of Maharashtra to remain dry!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

21 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

21 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

21 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

21 hours ago