उद्धव-राज यांचे तिरंगा रॅलीदरम्यान महायुतीवर टीकास्त्र

मुंबई :
केंद्र सरकारला नमवणार्‍या देशातील तरुणाईचे मी अभिनंदन करतो. मुंबईत जमलेली ही गर्दी कोणतीही निवडणूक झाल्यानंतरची नाही, तर अंधभक्तांंविरोधात देशभक्त जिंकल्यानंतरची आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे. हा संघर्ष भाजपविरुद्ध भारत असा आहे. या संघर्षात जात-पात, धर्म विसरून सहभागी व्हा. मी भारतीय आहे, ही जाणीव ठेवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि महायुती सरकारला लक्ष्य केले.

एका झुरळाने हुकूमशहाला नमवले आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मोदीजी आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचे काम सोडून इतर पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना आतातरी म्हणा देशाचे काम करा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन महागाई, घसरणारा रुपया यावर एक शब्द बोलत नाहीत, फक्त पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. राजनाथ सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत, पण आता ते धर्मेंद्र प्रधानांचे रक्षण करत होते. आपले खड्डामंत्री माफ करा, रस्तेमंत्री नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मला मोदींना सांगायचे आहे की, तुम्हाला तुमच्या लाडक्या
धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या. त्यापेक्षा जास्त यातना नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या असतील. निवडणुकांना आणखी दोन-अडीच वर्षे शिल्लक आहेत. पण निवडणुका गेल्या खड्ड्यात, मोदींना मते चोरता येतील, पण माणसे चोरता येणार नाहीत. ही ठिणगी आता जागती ठेवणे आपल्या सगळ्यांचे काम आहे. देशातील तरुणाईने देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहले आहे. आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधार्‍यांची मस्ती सहन करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे काय म्हणाले?
तुम्ही जे आंदोलन देशभरात पेटवले आणि त्याला जे यश आले त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. या देशातील जेन झी सरकारच्या झिंज्या कशा उपटते, हे या आंदोलनातून कळाले, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या 21 तरुणांची नावे वाचून दाखवत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मौन बाळगण्याचे आवाहन केले.
जो विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलेत, त्या आंदोलनाला यश आले. त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर झाले आहात. या देशातले जेन-झी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे आंदोलनातून समजले, असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजले आहे. मी संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतो, असे राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थवर झालेल्या गर्दीसमोर अमित ठाकरे नतमस्तक झाले आहेत. मंचावर डोके टेकवून त्यांनी तरुणाईला नमस्कार केला आहे. शिवतीर्थवरील जल्लोष सभेनंतर उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांनी बाल्कनीमधून तरुणाईला अभिवादन केले. यावेळी शर्मिला आणि रश्मी ठाकरेसुद्धा तिथे उपस्थित होत्या, तर संजय राऊत यांच्याही चेहर्‍यावर आनंद पाहायला मिळाला.

Thackeray brothers’ Elgar in Mumbai

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

20 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

20 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

20 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

21 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

21 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

21 hours ago