त्र्यंबकनगरीत संताप; फेरविचाराची मागणी
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या दर्शनपथाच्या कामासाठी 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2026 दरम्यान मंदिर दोन महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाने दिल्याने त्र्यंबकनगरीत संतापाची लाट पसरली आहे. हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, यामुळे त्र्यंबरनगरवासीयांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत दसरा (20 ऑक्टोबर), दिवाळी (6 ते 11 नोव्हेंबर) या प्रमुख सणांसह बारा उत्सवांमधील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा संस्थानचा 300 वर्षांचा त्रिपुरारी पौर्णिमेचा रथोत्सव आहे. मंदिर बंद राहिल्यास भाविक या सर्व धार्मिक उत्सवांना मुकतील. तसेच, दिवाळीनंतरच्या गर्दीच्या मोसमात मंदिर बंद ठेवल्यास स्थानिक व्यापार्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि मंदिराचेही किमान 15 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संथ कामांमुळे त्र्यंबकनगरीतील रस्ते व परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या दर्शनपथाच्या कामासाठी 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2026 दरम्यान मंदिर दोन महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाने दिल्याने त्र्यंबकनगरीत संतापाची लाट पसरली आहे. हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, यामुळे त्र्यंबकनगरवासीयांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कालावधीत दसरा (20 ऑक्टोबर), दिवाळी (6 ते 11 नोव्हेंबर) या प्रमुख सणांसह बारा उत्सवांमधील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा संस्थानचा 300 वर्षांचा त्रिपुरारी पौर्णिमेचा रथोत्सव (24 नोव्हेंबर) आहे. मंदिर बंद राहिल्यास भाविक या सर्व धार्मिक उत्सवांना मुकतील. तसेच, दिवाळीनंतरच्या गर्दीच्या मोसमात मंदिर बंद ठेवल्यास स्थानिक व्यापार्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि मंदिराचेही किमान 15 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संथ कामांमुळे त्र्यंबकनगरीतील रस्ते व परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. शासकीय कार्यालये आणि उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित झाल्यामुळे आधीच बाजारपेठ मंदावली आहे. त्यात आता मंदिर बंद ठेवल्यास उरलेले व्यवसायही ठप्प होऊन बेरोजगारीचा प्रश्न बिकट होईल. परिणामी, बँक कर्जाचे हप्ते फेडणे आणि मुलांच्या शिक्षणाची फी भरणे नागरिकांना अशक्य होऊन बसेल. कोणत्याही ठोस पूर्वनियोजनाशिवाय आणि पर्यायी व्यवस्थेविना ऐन सिंहस्थाच्या तोंडावर विकासकामांच्या नावाखाली त्र्यंबकनगरीला वेठीस धरले जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
The Trimbak temple will remain closed for two months.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…