नवी दिल्ली : प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात (व्होट चोरी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीत सलग तिसर्या दिवशी आक्रमक आंदोलन केले. जंतर-मंतर आणि आकाशवाणी भवनाबाहेर झालेल्या जोरदार निदर्शनांनंतर गुरुवारी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजघाटावर धाव घेत निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला.
‘इंडिया’ आघाडीचे खासदार आणि नेते लंच डिप्लोमसीनंतर एका बसमधून थेट राजघाटाकडे रवाना झाले. राजघाटावरील हे आंदोलन काँग्रेससाठी एक प्रतीकात्मक लढा असून, महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपण लढत असल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशद्रोह केला आहे. जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. हा लढा एका भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमार यांनी गुन्हेगारी कारस्थान रचून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण आमचे प्राण गेले तरी आम्ही हे होऊ देणार नाही.
गेल्या तीन दिवसांपासून देशाच्या राजधानीत प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
ज्ञानेश कुमारांच्या सुरक्षेत मोठी वाढ
विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थान, कार्यालय आणि उत्तर प्रदेशातील मूळ गावातील घराबाहेरही पोलिसांसह निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Rahul Gandhi sounded the bugle for battle from Rajghat.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…