नाशिक

भुजबळ फार्म परिसरात दोन दिवसांत तिसरा अपघात

सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई महामार्गालगतच्या भुजबळ फार्म परिसरात असलेल्या इंदिरानगर बोगद्याजवळ अपघातांचे सत्र कायम असून, गेल्या दोन दिवसांत तिसरा अपघात घडल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून धुळ्याकडे जाणार्‍या ट्रकची पिकअप आणि एका चारचाकी वाहनाशी धडक झाली.
या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
दरम्यान, मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळील भुजबळ फार्म परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली आहे. या ठिकाणी वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, इशारा फलकांची उभारणी, रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना तसेच वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दोन दिवसांत तिसरा अपघात घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून धुळ्याकडे जाणारा ट्रक आणि एक पिकअप वाहन यांची धडक एका चारचाकी वाहनाला बसल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, ट्रकचालकाला चौकशीसाठी अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. भुजबळ फार्म परिसरात सलग अपघात घडत असल्याने या ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

Third accident in the Bhujbal Farm area in two days.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago