नाशिक

महामार्ग बसस्थानकावर दुचाकीला अचानक आग

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

नाशिक : प्रतिनिधी
महामार्ग बसस्थानकावर शनिवारी (दि. 25 जुलै) प्रवाशाला सोडण्यासाठी आलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी तत्परता दाखवत स्थानकावरील अग्निशमन सिलिंडरचा वापर करून काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 एसपी 2900 क्रमांकाची दुचाकी घेऊन आर्यन पाटील व पी. एस. पाटील (मो. 9096456531, 885500870) हे प्रवाशाला सोडण्यासाठी महामार्ग बसस्थानकावर आले होते. प्रवाशाला बसमध्ये बसवित असताना दुचाकीतून धूर निघत असल्याचे त्यांच्या
निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने वाहतूक नियंत्रण कक्षात धाव घेत अग्निशमन सिलिंडरची मागणी केली. यावेळी कर्तव्यावरील वाहतूक नियंत्रक के. एल. लाड, डी. टी. शिंदे आणि आर. एम. मथुरे तसेच सुरक्षारक्षक एम. के. भामरे, एस. डी. बागूल आणि पी. एन. वागळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानकावर उपलब्ध असलेल्या अग्निशमन सिलिंडरच्या सहाय्याने दुचाकीला लागलेली आग विझवली.
कर्मचार्‍यांच्या समयसूचकता, धाडस आणि तातडीच्या कृतीमुळे आग इतर वाहनांपर्यंत किंवा स्थानक परिसरात पसरली नाही. तसेच एसटी महामंडळाचे कोणतेही नुकसान झाले नसून, कोणतीही जीवितहानीही झाली नाही. कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Two-wheeler suddenly catches fire at highway bus station.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

19 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

19 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

19 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

19 hours ago