अग्रलेख

का रे दुरावा? का रे अबोला?

दुसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्त वागण्याने जगाची चिंता वाढली आहे. सत्तेवर येताच त्यांनी अनेक देशांवर टेरिफ बॉम्ब टाकला. त्यातून भारतही सुटला नाही. अमेरिका नेहमीच स्वतःला जगाचा पोलीस समजत आली आहे. आता ट्रम्प हे जगाचा बिग बॉस बनू पाहत आहेत. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवणार होते. मात्र, युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी त्यांना चांगलीच चपराक लगावली. काही महिन्यांपूर्वी इस्रायल-हमास यांच्यात संघर्ष पेटला, तेव्हा त्यांनी नाहक इराणशी पंगा घेतला.
आपल्या दबंगगिरीचा परिचय देत त्यांनी व्हेनेझ्युएलावर कारवाई केली. हा एक सार्वभौम देश आहे. असे असताना अमेरिकन लष्कराने त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण केले. त्यांना कैदी बनवून अमेरिकेत आणले. आता त्यांच्यावर खटला चालविला जाणार आहे. पुन्हा एकदा इराण- अमेरिका संघर्ष वाढला आहे.
सुरुवातीला भारतावर त्यांनी तब्बल 25 टक्के टेरिफ लावले. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात भारत अमेरिकेला अधिक निर्यात करतो आणि कमी आयात होते. याचा भारताला फायदा होतो, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी टेरिफ लावले आणि भारताने अमेरिकेकडून जास्त आयात करावी, असा अट्टाहास करत आहे. या विरोधात त्यांना अनेक देशांनी खडे बोल सुनावले. मात्र, भारताकडून फारशी प्रतिक्रिया दिली गेली नाही. भारत नवीन बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने त्यांनी दावा केला की, माझ्यामुळेच दोन्ही देशांतील युद्ध थांबले. त्याचा ते वारंवार पुनरुच्चार करत आहेत. मात्र, याबाबत भारताने अनेकदा याचा इन्कार केला आहे. पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काहीच बोलत नाहीत. भारतातून कृषी उत्पादने, अवजारे, औषधे, वैद्यकीय साहित्य, इलेक्ट्रॉनिक ऊपकरणे, स्टील, अ‍ॅल्युमिनियम यांसारख्या वस्तू निर्यात केल्या जातात. अमेरिकेतील उद्योगपती, व्यावसायिक इतर देशांतून स्वस्त आयातीचा प्रयत्न करतील. परिणामी आपल्या निर्यातीवर याचा विपरीत परिणाम होऊन आपले परकीय चलनदेखील घटणार आहे. त्याचबरोबर मागणी तसा पुरवठा या सूत्राप्रमाणे जर मागणीच नसेल तर उत्पादनदेखील थांबणार आहे आणि एकूणच अर्थचक्रावरदेखील परिणामहोणार आहे. आजवर कृषीसंबंधी उत्पादन, अवजारे यांचा बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये समावेश नव्हता. मात्र, आता अमेरिकेतून भारताला अनेक कृषी उत्पादने आयात करावी लागणार आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्या पैशांचा वापर युक्रेन युद्धासाठी होतो, असे कारण सांगून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लावला. परिणामी भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आणि भारताला अमेरिकेकडून महाग तेल खरेदी करावी लागत आहे.
एवढ्यावरच ट्रम्प यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी रशिया, ब्राझील, भारत या तीन देशांवर तब्बल पाचशे टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आणि तसा कायदा पास करून घेतला. आता लवकरच त्याची अंमलबजावणी होऊ शकते. तसे झाले तर भारतातून अमेरिकेत होणार्‍या निर्यातीवर याचा मोठा विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था आणखीच विस्कळीत होईल. वास्तविक ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत व्यक्तिशः ट्रम्प आणि मोदी यांच्यात चांगले संबंध होते. आता मात्र तसे संबंध राहिलेले नाहीत. दोघांमध्ये संवादाचा अभाव दिसतो. टेरिफबाबत चर्चा होत नाही. बॅलन्स ऑफ ट्रेडसाठी चर्चा करावी यासाठी अमेरिकेने तीन आठवडे वाट पाहिली. मात्र, भारताकडून चर्चा झाली नाही, असे अमेरिकचे परराष्ट्रमंत्री म्हणतात. मध्यंतरी ट्रम्प मी नाराज असून, मोदी मला खूश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्याची मोठी चर्चा होत आहे. दोघांमध्ये संवाद का होत नाही याबाबत स्वतः पंतप्रधान मोदी यांनी पुढे येऊन देशाला सांगायला हवे.
शपथविधी होतानादेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना बोलावले नव्हते. बदललेल्या काळात जग हे ग्लोबल व्हिलेज बनले आहे. अशा परिस्थितीत एकमेकांचे सहकार्य असणे ही काळाची गरज आहे. भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते वाटते तितके सोपे नाही. अशावेळी महाशक्ती अमेरिकेबरोबर कसा व्यवहार करायचा याबाबत भारतापुढे मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिका, चीन, रशिया या तीन महाशक्तींच्या सुप्त संघर्षात भारताला मात्र मोठी कसरत करावी लागते आहे. माय फ्रेंड डोनाल्ड, म्हणूनही काहीच फायदा झाला नाही. याउलट दोघांमध्ये का रे दुरावा? का रे अबोला? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडणेच हिताचे ठरेल.

Why the distance? Why the Ebola?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

4 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

17 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

54 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago