जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम
नाशिक : प्रतिनिधी
गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील तब्बल 149 साध्या बसेस ठाणे आणि मुंबई परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागातील 13 आगारांमधील या बसेस सध्या मीरा-भाईंदर, बोरिवली आणि खारेगाव येथील नियोजित पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या असून, मोठ्या संख्येने बसेस बाहेर गेल्याने सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील अंतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरील एसटी वाहतुकीवर परिणाम होत आहे.
मिळालेल्या अधिकृत यादीनुसार, नाशिक 1 आणि नाशिक 2 आगारातील प्रत्येकी 15, मालेगाव आणि सटाणा आगारातील प्रत्येकी 15, कळवण आगारातील 15, सिन्नर आगारातील 13, मनमाड आणि नांदगाव आगारातील प्रत्येकी 10, येवला आगारातील 10, पेठ, लासलगाव आणि पिंपळगाव आगारातील प्रत्येकी 8, तर इगतपुरी आगारातील 7 बसेस गणपती विशेष सेवेसाठी बाहेर पाठविण्यात आल्या आहेत. यातील नाशिक 1, नाशिक 2 आणि लासलगाव आगाराच्या बसेस जे. पी. रोड, मीरा-भाईंदर येथे, मालेगाव, सटाणा, मनमाड आणि नांदगाव आगाराच्या बसेस बोरिवली नॅन्सी येथे, तर कळवण, सिन्नर, येवला, पेठ, पिंपळगाव आगाराच्या बसेस क्रीडा मंडळ, खारेगाव येथे पार्क करण्यात आल्या आहेत. इगतपुरी आगाराच्या सात बसेसही जे. पी. रोड, मीरा-भाईंदर येथे आहेत. गणपती उत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने जाणार्या प्रवाशांना अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागातील हा मोठा बस ताफा बाहेर पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याचा परिणाम नाशिक विभागातील नियमित वाहतुकीवर होत असून, अनेक मार्गांवर उपलब्ध बसेसचे नियोजन करताना आगार प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेर्यांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. नाशिक विभागातील या 149 बसेस पुन्हा मूळ आगारांच्या सेवेत दाखल झाल्यानंतरच नियमित वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात पाठविण्यात आलेल्या बसेस परतण्याच्या कालावधीकडे नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
149 ST buses from Nashik to Konkan for Gauri-Ganpati
राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्या कार्यक्रमांची…
पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला…
सीसीटीव्हीत थरार कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के…
12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…
सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…
मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून,…