नाशिक

अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार
नाशिक : प्रतिनिधी
सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे आणि दुःखद आहे. मात्र, सिद्धार्थनगर येथे ज्या परिसरात अपघाताची घटना घडली त्या ठिकाणी रस्ता बंद करण्यात येऊन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.
रस्त्यात पाइप टाकलेला असला तरी त्याला सुरक्षितता म्हणून रिफ्लेक्टर लावून दक्षता घेण्यात आलेली आहे. अपघातग्रस्त गाडीची परिस्थिती बघितल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की गाडी प्रचंड भरधाव वेगाने होती. सदर रस्त्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी इतकी भरधाव वेगाने गाडी कशी चालवली गेली? सदर ठिकाणी 50 मीटर अंतरावर रस्ता बंद असल्याबाबत आवश्यक सूचना लावलेली आहे. सदर घडलेल्या घटनेबाबत लगतच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याची कारवाई सुरू आहे.
सदर रस्त्यावर सर्व लाईट सुरू असूनदेखील सदर दुचाकी अतिशय वेगाने धडकली आहे. सदर व्यक्तीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट प्रतीक्षेत आहे. तरीही संबंधित घटनेची चौकशी करून यात दोषी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी म्हटले आहे.

The road was closed.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राजधानीतील गणेशोत्सवाची धूम

राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्‍या कार्यक्रमांची…

6 minutes ago

बाप्पा मोरया रे…

पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला…

9 minutes ago

पिंजर्‍यातील कुत्र्यावर बिबट्याची झडप

सीसीटीव्हीत थरार कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के…

13 minutes ago

प्रतिबंधित गुटखा, तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक पकडला

12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…

16 minutes ago

गौरी-गणपतीसाठी नाशिकच्या 149 एसटी बसेस कोकणात

जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…

34 minutes ago

मनपा जलवाहिनीच्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुण ठार

मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून,…

45 minutes ago