नाशिक

रेणुकामाता नवरात्रोत्सवास चांदवड सज्ज

भाविकांसाठी सहा सभागृहांत घटीची व्यवस्था, दर्शनास स्वतंत्र रांगा

चांदवड : वार्ताहर
चांदवडच्या कुलस्वामिनी श्री रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवासाठी मंदिर संस्थानकडून जय्यत तयारी केली आहे. रविवार (दि. 11)पासून सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था, घटी बसण्यासाठी सभागृह, निवारा, पाणी, आरोग्य व सुरक्षेसह विविध सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यंदा सहा सभागृहांमध्ये एक हजारांहून अधिक भाविकांना घटी बसता येणार असल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार व सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना व आरती होणार असून, दररोज पहाटे 5 वाजता महाभिषेक, पालखी मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रम होतील. अष्टमी व नवमीला होमहवनाचे आयोजन केले आहे. सकाळ आणि रात्रीच्या महाआरतीसाठी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिराच्या माथ्याकडून व पायथ्याकडून येणार्‍या भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा करण्यात आल्या आहेत. शिर्डीच्या धर्तीवर स्टील बॅरिकेडिंग करण्यात आले असून, यंदा सुमारे 15 हजार चौरस फुटांचा दर्शनरांग डोम उभारण्यात आला आहे. ऊन, वारा व पावसापासून भाविकांचे संरक्षण व्हावे, यासाठी निवाराशेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. घटी बसणार्‍या भाविकांसाठी निवासाची सुविधा असून, महिलांसाठी गरम पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. पिण्याचे पाणी, वीज, जनरेटर, इन्व्हर्टर, बोअरवेल व विहीर आदी सुविधा उपलब्ध करण्यात
आल्या आहेत.
नवरात्रोत्सव काळात भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी मोफत साबुदाणा खिचडी, केळी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिर परिसरात संस्थान, पुरातत्त्व विभाग व शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. मंदिराचा चांदीचा गाभारा विस्तारीत करण्यात आला असून, भाविकांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र व प्रशस्त मार्ग तयार करण्यात आले आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी, प्रोजेक्टर, सौरऊर्जा पथदिवे आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

आरोग्य व सुरक्षा यंत्रणा सज्ज

उत्सवकाळात भाविकांच्या आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत राहणार आहे. मंदिर परिसरात पोलीस मदत केंद्र उभारले असून, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्त्यांवरही विद्युत दिव्यांची व्यवस्था केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध शासकीय व सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत. व्यवस्थापक एम. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे कर्मचारी, विविध भक्त मंडळे व सामाजिक कार्यकर्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

होळकरकालीन कुंडाचे सुशोभीकरण

होळकरकालीन श्री रेणुकादेवी कुंडाची स्वच्छता करून त्यातील गाळ काढण्यात आला आहे. कुंडाभोवती तारकंपाउंड, विद्युत दिवे व प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या परिसरात बगिचा विकसित केल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते.

 

Chandwad geared up for the Renukamata Navratri festival.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago