राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

फोल्डेबल स्मार्टफोन ’आयफोन ड्युओ’ लॉन्च

‘पल’चा 20 वर्षांतील सर्वांत मोठा धमाका

मुंबई : प्रतिनिधी
पलने 9 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या बहुचर्चित इव्हेंटमध्ये तंत्रज्ञान विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. टिम कुक यांच्यानंतर पलचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या जॉन टर्नस यांनी त्यांच्या दुसर्‍याच आठवड्यात कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल जगासमोर सादर केला. या सोहळ्यात पलने आपला पहिलावहिला फोल्डेबल स्मार्टफोन ’आयफोन ड्युओ’ लॉन्च केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी ’आयफोन 18 प्रो’ सिरीज, पल वॉच 12 सिरीज आणि एअरपॉड्स5 देखील आणण्यात आले आहेत.
’आयफोन ड्युओ’ हा पलचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि महागडा आयफोन ठरला आहे. पुस्तकाप्रमाणे किंवा पासपोर्टसारखा उघडणारा हा फोल्डेबल फोन डिझाइन आणि तंत्रज्ञानाचा उत्तम आविष्कार मानला जात आहे. अमेरिकेत या फोनची सुरुवातीची किंमत 1,999 डॉलर्स म्हणजे सुमारे एक लाख 90 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडेलची किंमत 3,200 डॉलर्सपर्यंत म्हणजे तीन लाख रुपयांपर्यंत जाते. आयपॅडच्या डिझाइनवरून प्रेरणा घेतलेल्या या फोनची फोल्डिंग यंत्रणा अतिशय सहज आणि नैसर्गिक असल्याचे जॉन टर्नस यांनी यावेळी
स्पष्ट केले.
कॅलिफोर्नियातील पल पार्कमधून जगभरात प्रसारित झालेल्या या इव्हेंटने स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा पलचे वर्चस्व सिद्ध केले आहे.
जॉन टर्नस यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच मोठी घोषणा असल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे याकडे विशेष लक्ष होते. नवीन ए20 प्रो चिपसेट आणि प्रगत पल इंटेलिजन्सने (सिरी एआय) सज्ज असलेले ’आयफोन ड्युओ’ आणि ’आयफोन 18 प्रो’ मॉडेल्स स्मार्टफोनच्या भविष्याची नवी दिशा ठरवणार आहेत.

टीकाकारांना उत्तर
सन 2007 मध्ये पहिल्या आयफोनच्या लाँचिंगनंतर पलने आपल्या डिझाइनमध्ये कोणताही मोठा किंवा क्रांतिकारी बदल केला नसल्याची टीका तंत्रज्ञान समीक्षकांकडून वारंवार होत होती. मात्र, ’आयफोन ड्युओ’च्या सादरीकरणातून कंपनीने या सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. जवळपास 20 वर्षांच्या आयफोनच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा आणि धाडसी डिझाइन बदल आहे. या फोल्डेबल आयफोनमध्ये एअरोस्पेस-ग्रेड टायटॅनियम फ्रेम आणि ड्युअल-बॅटरी सिस्टिमसारखे प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

 

Foldable smartphone ‘iPhone Duo’ launched.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago