रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मल्होत्रा यांच्या घोषणेचा परिणाम

नवी दिल्ली : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली अस्थिरता, वाढती महागाई, भांडवली बाजारातील मोठी पडझड या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी (दि. 7) रेपो रेटमध्ये वाढ करत असल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्के झाला आहे. याचा परिणाम आता कर्जदारांवर होणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकांकडून लवकरच गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या सामान्य नागरिकांचा मासिक हप्ता म्हणजे ईएमआय वाढण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षांमध्ये रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याचे बोलले जात आहे. कच्च्या तेलांच्या किंमतीत होत असलेल्या सातत्याने भारतासाठी चिंतेचा विषय आहे. महागाई दरात सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण आरबीआयने यावेळी नोंदवले.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीत रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुतांश अर्थतज्ज्ञांनी रेपो रेटमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. फेब्रुवारी 2025 नंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर किंवा त्यामध्ये कपात करण्याचे धोरण ठेवले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के इतका केला होता. 2023-24 या आर्थिक वर्षात रेपो रेटचा हा दर कायम होता. त्यानंतर फेब्रुवारी 2025 पासून रिझर्व्ह बँकेने सातत्याने रेपो रेटमध्ये कपात करत तो 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.

रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात तो दर. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझव्हर्र् बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणे, तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. कमी झाल्याने व्याजदर कमी होतो. बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात. जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावे लागेल. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करून फायदा मिळवून देते.

Repo rate hike: EMIs to rise too.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago