नाशिक

एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिडको : प्रतिनिधी
म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी सायंकाळी एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ येथील गजपंथ कॉलनीसमोरील बजाज शोरूमजवळून नाशिकहून कळवणच्या दिशेने एसटी बस (एमएच 14 एमएच 1472) जात होती. त्याच दिशेने एक दुचाकी (एमएच 15 जेटी 9338) जात होती. शोरूमजवळ दोन्ही वाहनांमध्ये अपघात होऊन दुचाकी बसच्या चाकाखाली आली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, दुचाकीच्या क्रमांकावरून तसेच उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सायंकाळच्या वेळी अपघात झाल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे दिंडोरी रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी हटविली आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया
सुरू होती.

Two-wheeler rider dies after coming under ST bus

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

प्रतिबंधित गुटखा, तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक पकडला

12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…

49 seconds ago

गौरी-गणपतीसाठी नाशिकच्या 149 एसटी बसेस कोकणात

जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…

18 minutes ago

अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…

24 minutes ago

मनपा जलवाहिनीच्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुण ठार

मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून,…

30 minutes ago

दोन मिनिटे उशीर झाल्याने यूपीएससी परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला

पालक, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; यूपीएससी विद्यार्थ्यांना खड्डे, ट्रॅफिकचा मोठा फटका नाशिक : प्रतिनिधी यूपीएससी परीक्षेच्या…

37 minutes ago

येवल्यात डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

येवला : प्रतिनिधी शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी (दि. 13) सकाळी अकराला भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार…

52 minutes ago