येवला : प्रतिनिधी
शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी
(दि. 13) सकाळी अकराला भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले तरुण व्यावसायिक कोपरगाव येथील होते. अपघातानंतर डंपरचालक फरार असून, याप्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आसिफ मोहम्मद शेख (वय 32) आणि सईफ रफिक शेख (वय 17, दोघे रा. कोपरगाव) हे आपल्या दुचाकीने (एमएच 17, बीडब्ल्यू 5864) जात असताना येवला शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर डंपरने (एमएच 12 एलटी 9980) जोरदार धडक देऊन या दोघांना चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. दोन तरुण व्यावसायिकांच्या मृत्यूनंतर कोपरगावसह परिसरात व खाटीक समाजात तीव्र शोककळा पसरली आहे. पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.
Two youths killed in dumper accident in Yewala
जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…
सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…
मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून,…
पालक, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; यूपीएससी विद्यार्थ्यांना खड्डे, ट्रॅफिकचा मोठा फटका नाशिक : प्रतिनिधी यूपीएससी परीक्षेच्या…
सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी सायंकाळी एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…
आज होणार प्रतिष्ठापना; नागरिकांसह मंडळे सज्ज नाशिक : प्रतिनिधी लाडक्या गणरायाचे आज आगमन होत असून,…