वॉशिंग्टन/तेहरान/मुंबई :
मध्यपूर्वेतील तणाव आता थेट उघड लष्करी संघर्षात रूपांतरित झाला आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेवर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये भीषण ’ऑइल वॉर’ भडकले आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत अमेरिकन सैन्याने पर्शियन गल्फमध्ये कारवाई करत इराणचे पाच तेल टँकर क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केले आहेत. एवढेच नव्हे, तर इराणच्या अत्यंत मोक्याच्या मानल्या जाणार्या ’खार्ग बेटा’वरील सर्वांत मोठ्या तेल टर्मिनलवरही जोरदार हवाई हल्ला चढवण्यात आला आहे. या थेट लष्करी कारवाईमुळे आखाती प्रदेशातील सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण मध्यपूर्व क्षेत्र युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
अमेरिकेने इराणच्या तेल टँकर आणि टर्मिनलला लक्ष्य केल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) पुरवठा साखळीवर अभूतपूर्व संकट ओढवले आहे. पर्शियन गल्फ हा जागतिक ऊर्जा वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्याने, युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी घबराट पसरली आहे.
तेलाचा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये एकाएकी प्रचंड उसळी घेतली आहे. तेलाच्या दरात झालेल्या या तीव्र भडक्यामुळे जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये महागाई वाढण्याची भीती अधिक गडद झाली आहे. आखातातील युद्धाचा भडका आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचे अत्यंत नकारात्मक पडसाद भांडवली बाजारावर उमटले असून, शेअर बाजारात मोठी घसरण झाली. देशांतर्गत बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटी चौफेर विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने विशेषतः बँकिंग, आयटी आणि आघाडीच्या ब्ल्यूचिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठे अवमूल्यन झाले. या तीव्र विक्रीच्या दबावामुळे काही तासांतच लाखो कोटींचे भांडवल वाहून गेले असून, गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका बसला आहे.
War breaks out again between America and Iran
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…