आरोग्य

जिर्‍याचे पाणी पिण्याचे फायदे

जिरापाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जिरापाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये जिरे वापरतात. जिरे टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.
जीरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते. जिरे पाणी पिण्यामुळे वजन कमी होते बद्धकोष्ठता जीर्‍याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या
संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो.

वजन कमी करतो जीर्‍यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढते. ज्यामुळे शरीरातून चरबी कमी होते.हार्ट अटैकचा धोका कमी करतो जीरा पाणी शरीरातील फैट आणि कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रोलची कमी हार्ट अटैकचा धोका कमी करण्यास मदत होते. मासपेशीच्या वेदना पासून आराम जीरा पाणी शरीरातील रक्त संचार वाढवतो. यामुळे मासपेशीच्या वेदना कमी होतात. आणि शरीर थकण्या पासून वाचवतो.इम्यूनिटी सिस्टम मजबूत करतो रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असेल तरच आजारा पासून बचाव होतो.

जिर्‍याच्या पाण्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. आयर्न आपली रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. याच सोबत जीर्‍यामध्ये विटामिन ए आणि सी असते. यामुळे इम्युनिटी लेवल वाढते.एनीमिया दूर करण्यास मदत करते रक्ताची कमी एनिमिया रोग असतो. याचा उपाय जीर्‍याच्या पाण्याने केला जाऊ शकतो. जीर्‍यामध्ये आयरन भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे एनिमियाची समस्या देखील दूर होऊ शकते. जर शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर नियमितपणे जीर्‍याचे पाणी सेवन करावे. झोपेची समस्या दूर करतो झोपेची समस्या वजन वाढल्यामुळे होते. वजन वाढल्यावर झोपेची समस्या होणे सामान्य आहे. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जीर्‍याचे पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो

 

हे ही वाचा :

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago